Mumbai Reservoir : मुंबईकरांसाठी महापालिकेचा मोठा निर्णय! धरणांतील पाणीसाठा 76 टक्क्यांवर, उचललं महत्त्वाचं पाऊल

Mumbai Reservoir Water Level : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. अपेक्षित पाऊस न झाल्याने ही पाणीकपात अद्याप कायम आहे.

Mumbai Reservoir : मुंबईकरांसाठी महापालिकेचा मोठा निर्णय! धरणांतील पाणीसाठा 76 टक्क्यांवर, उचललं महत्त्वाचं पाऊल
BMC
| Updated on: Nov 24, 2026 | 8:35 AM

मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता शहरातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक विभागांना 30 लाखांचा निधी दिला जाणार आहे. विहिरींमधील गाळ काढणे, स्वच्छता, दुरुस्ती आणि पंप बसविण्याची कामे या निधीतून केली जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक विभागातील पाच विहिरींची निवड करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे 7 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मुंबईची दररोजची पाण्याची गरज सुमारे 4 हजार 500 दशलक्ष लिटर असताना, सध्या धरणांमधून सुमारे 4 हजार 100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.

एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. अपेक्षित पाऊस न झाल्याने ही पाणीकपात अद्याप कायम आहे. त्यामुळे पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी महापालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल आणि विहिरींच्या पुनरुज्जीवनावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर जलअभियंता विभागाने विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी प्रस्ताव तयार केला होता. आवश्यक बाबींची पूर्तता करून सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विभागांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Loading...

मुंबईचा जलसाठी किती टक्क्यांवर?

या निधीचा वापर विभागीय सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या मंजुरीनेच करता येणार आहे. 30 लाखांपेक्षा अधिक निधीची आवश्यकता भासल्यास अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आणि महापालिका आयुक्तांची स्वतंत्र मंजुरी घ्यावी लागणार आहे. मुंबईकरांचे टेन्शन वाढले असून जलसाठा 76 टक्क्यांवर आला आहे. मुंबई आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील जलसाठा सोमवारी 76.80 टक्क्यांपर्यंत खाली आला. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 89.90 टक्के इतका होता. म्हणजेच तुलनेने सुमारे 13 टक्क्यांची घट झाली आहे.

पाण्यासाठी नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज

वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत असून पाण्याची पातळी खाली घसरत चालली आहे. मुंबईकरांवर 10 टक्के पाणीकपात लागू असताना आगामी काळात पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. यादृष्टीने पालिका प्रशासनाने पाणी गळती रोखणे आणि विहिरींच्या पुनरुज्जीवन करण्याकडे लक्ष दिले आहे. मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी 7.8 कोटींची निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us