BMC Diwali Bonus 2021: मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’, प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस जाहीर

| Updated on: Oct 29, 2021 | 7:25 PM

बैठकीला उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

BMC Diwali Bonus 2021: मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी, प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस जाहीर
प्रशासन व सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली असून त्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही बैठकीत पार पडली. (BMC Diwali Bonus 2021, Mumbai Municipal Corporation and BEST employees announce ‘Diwali’ bonus)

बैठकीला उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः

1. महापालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षकः रु. 20,000/-
2. माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारीः 10,000/-
3. प्राथमिक शिक्षण सेवकः रु. 5,600/-
4. आरोग्य सेविकाः रु. 5,300/-
5. विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवकः रु. 2,800/-

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना 12 हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना 7 हजार 200 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल,” अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोप प्रसंगी केली.

सुरुवातीला वर्ग 1 व 2 च्या अधिकारी यांना वगळून 10 हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली. (BMC Diwali Bonus 2021, Mumbai Municipal Corporation and BEST employees announce ‘Diwali’ bonus)

इतर बातम्या

आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स आणि हाय व्होल्टेज ड्रामा; दिवसभरात नेमकं काय घडलं?

Video: वधूजवळ जाण्यासाठी वरापुढे मेव्हणीच्या अजब अटी, लग्नातील एका भन्नाट प्रथेचा व्हिडीओ व्हायरल