
मागच्या महिन्यात धुरंधर चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कमाल केली. अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करतोय. या चित्रपटाचं जे नाव आहे, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही क्षेत्रात इतरांपेक्षा सरस, इतरांना चकीत करणारी कामगिरी करणाऱ्यांना धुरंधर म्हटलं जातय. कालच मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला. त्याआधी नगर परिषदांचे निकाल लागले. निकालाच्या या सर्व आकड्यांवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे धुरंधर असल्याचं सिद्ध झालय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय. आधी नगरपरिषदा आणि आता महापालिका जिंकून भाजपने आपली शक्ती दाखवून दिलीय.
महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि सर्वाधिक महापालिका भाजपने जिंकल्या आहेत. 29 महापालिकांमध्ये निवडणूक होती. त्यातल्या प्रतिष्ठेच्या मुंबईसह 25 महानगर पालिकांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. पुणे, नाशिक या महत्वाच्या महापालिका सुद्धा भाजपने जिंकल्या आहेत. भाजप हा केडर बेस असलेला पक्ष आहे. भाजपं या सत्तेचा वापर पुरेपूर पक्ष विस्तारासाठी करणार हे निश्चित. विजयाचं श्रेय सामूहिक नेतृत्वाला देण्याची भाजपची परंपरा असली तरी याचे खरे रणनितीकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे. भाजपने 2014 साली दुसऱ्यांदा महाराष्ट्राची सत्ता मिळवली. पण यावेळी ते मोठ्या भावाच्या भूमिकेत होते.
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
ते सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये होते
देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपने संपूर्ण राज्यात वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली. 2019 च्या विधानसभेला भाजपकडे बहुमत नव्हतं. पण युती म्हणून ते सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अडीचवर्ष भाजपला सत्तेबाहेर रहावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपने सरकार बनवलं. फडणवीसांना पक्षादेश मानून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. 2024 च्या विधानसभेत महायुतीने पुन्हा बहुमत मिळवलं. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
देवेंद्र पॅटर्नने भाजप नेते घडवणार का?
या 11 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वोच्च नेते बनले आहेत. दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र असं म्हटलं जातं. आज महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशल रणनितीने जी समीकरणं बनवली. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष बनला आहे. देवेंद्र फडणवीसांना जेव्हा याचं श्रेय दिलं जातं, तेव्हा ते विनम्रतेने नाकारतात. ते म्हणतात भाजप माझ्या पाठीशी आहे म्हणून मी हे करु शकतो. आज भाजपने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक धुरंधर नेता घडवलाय. आता इतर राज्यातही अशाच देवेंद्र पॅटर्नने भाजप नेते घडवणार का?