Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मुंबईत 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग? अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा…?
Mumbai BMC Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi : मुंबईत तब्बल 9 वर्षांनी काल मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सर्वच पक्षांसाठी मुंबई जिंकणं प्रतिष्ठेच मानलं जातं. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवारांनी निवडणूक लढवली. मुंबईकरांचा कौल कुणाला? ते काहीवेळात स्पष्ट होईल.

LIVE NEWS & UPDATES
-
Mumbai Election Results Live 2026 : कांदिवलीत मतमोजणी कुठे होणार?
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल काही वेळात येणार आहेत. मतमोजणीला 10 वाजल्यापासून शुरुवात होणार आहे. कांदिवली पश्चिम मुंबई पब्लिक स्कूल येथे प्रभाग क्रमांक 19 ते 31 पर्यंतचा निवडणूक परिणाम काही वेळात यायला सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिका कोणाची? महापौर कोण होणार? हे सर्व काही वेळात समोर येणार आहे.
-
Mumbai Election Results Live 2026 : मुंबईत किती केंद्रांवर होणार मतमोजणी?
मुंबई महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मुंबईमध्ये 23 मतदान केंद्रांवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आणि यंदा मतमोजणी प्रक्रिया ही थोडी वेगळी असणार आहे. यंदा 2 वॉर्ड ची मतमोजणी प्रक्रिया संपल्यावर दुसऱ्या 2 वॉर्डची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. सध्या मुंबई मधील सायन परिसरातील एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली आहे.
-
-
BMC Election Results Live 2026 : वरळी विधानसभा मतदार संघात मतमोजणी कक्ष सज्ज
वरळी विधानसभा मतदार संघात मतमोजणी कक्ष सज्ज आहे. जी दक्षिण प्रभागात एकूण 7 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
-
BMC Election Results 2026 : मुंबईत किती वाजता सुरु होणार मतमोजणी ?
मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज 16 जानेवारीला होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी एकाचवेळी दोन मतदारसंघांची मोजणी होईल.
-
BMC Election Results 2026 : Axix My India एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
Axix My India एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा? जाणून घ्या
BMC – Exit Poll – Seat Share – Vote Share (%)#BMCElections2026#ExitPoll2026#AxisMyIndia pic.twitter.com/xE535uMm3B
— Axis My India (@AxisMyIndia) January 15, 2026
-
-
BMC Election Results 2026 : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत
महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ठाकरे बंधुंना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेसला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इतरांना फक्त 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
-
BMC Election Results 2026 : एक्झिट पोल्सचा कौल काय?
मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे ठाकरे कुटुंबाची सत्ता आहे. कालच्या मतदानानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजप-शिवसेना महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेत आता दोन गट असून अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ते भाजपसोबत आहेत.
-
-
BMC Election Results 2026 : मुंबईत 25 वर्षातील रेकॉर्ड मतदान
मुंबईत काल 9 वर्षांनी मतदान झालं. 25 वर्षांचा रेकॉर्ड या मतदानाने मोडला आहे. 55 टक्क्यांच्या घरात मतदान झालं. मतदारांना काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. पण मतदानाच्या टक्केवारीतून उत्साह दिसून येतोय.
राज्यात काल 29 महापालिकांसाठी मतदान झालं. आज त्या महापालिका निवडणुकीचा निकाल येणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेना म्हणजे ठाकरे. पण 2022 साली शिवसेनेत दोन गट पडले. आज अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, तर उद्धव ठाकरे गट मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईवर ठाकरे कुटुंबाचं एकहाती वर्चस्व होतं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईमध्ये आज ठाकरे बंधू अस्तित्वाची लढाई लढतायत. म्हणूनच परस्परांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव आणि राज ठाकरे यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली. दुसऱ्याबाजूला त्यांच्यासमोर बलाढ्य भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं आव्हान आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडणार ते आज स्पष्ट होईल.
Published On - Jan 16,2026 6:06 AM
