मुंबईवरील पाणी कपातीचं संकट पुढे ढकललं

| Updated on: Dec 02, 2019 | 11:52 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील पाणी कपातीचं संकट काही दिवसांनी पुढे ढकललं आहे. (Water supply center repairing work in Mumbai ).

मुंबईवरील पाणी कपातीचं संकट पुढे ढकललं
Follow us on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील पाणी कपातीचं संकट काही दिवसांनी पुढे ढकललं आहे. पिसे उदंचन येथील केंद्रावर दुरुस्तीच्या कामामुळे सुरुवातीला ही पाणी कपात 3 ते 9 डिसेंबर दरम्यान करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं (Water supply center repairing work in Mumbai ). मात्र, आता ही पाणी कपात 7 ते 13 डिसेंबरदरम्‍यान होणार आहे.

पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्‍ती कामामुळे मुंबईत एक आठवडाभर जवळपास नियोजित 10 टक्‍के पाणीकपात होणार आहे. पिसे केंद्रात न्‍यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्‍ती करण्‍यात येणार आहे. त्‍या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. पाणीकपातीच्‍या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. दुरुस्‍ती कामाची आवश्‍यकता लक्षात घेता, नागरिकांनी कपात कालावधीत सहकार्य करावे. तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.

मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा अंदाज घेऊन मुंबईकरांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन केले आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा 7 धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.

नव्या धोरणानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.