390 कोटींचा निधी अखेर मिळाला; नगरसेवकांचं आता ‘मिशन ऑक्टोबर’

| Updated on: Feb 15, 2021 | 6:54 PM

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या खात्यातून गायब झालेला 390 कोटींचा निधी अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. (bmc release 390 cr development fund for corporators)

390 कोटींचा निधी अखेर मिळाला; नगरसेवकांचं आता मिशन ऑक्टोबर
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या खात्यातून गायब झालेला 390 कोटींचा निधी अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबरपर्यंत नगरसेवकांना हा निधी विकासकामांवर खर्च करायचा असल्याने आता सर्वच नगरसेवक हा निधी खर्च करण्याच्या कामाला लागले आहेत. (bmc release 390 cr development fund for corporators)

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेचा अर्थसंकल्प मांडताना पालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, 24 प्रभागातील 232 नगरसेवकांचा 390 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या खात्यातून शुक्रवारी अचानक गायब झाला होता. एवढंच नव्हे तर ज्या विकास कामांची वर्क ऑर्डर निघालेली होती. त्या कामांचा निधी सुद्धा खात्यातून गायब करण्यात आला होता. अचानक गायब झालेल्या या निधीवर प्रशासनाकडून काहीच उत्तर दिलं जात नसल्याने नगरसेवकांची झोप उडाली होती. आधीच कोरोनामुळे वर्षभर विकासकामे करता आली नाही. त्यातच आता पुढील वर्षी निवडणुका असल्याने विकास कामे करायची कशी? असा प्रश्न या नगरसेवकांना पडला होता. विकासकामे केली नाही किंवा सुरू असलेली कामे पूर्ण झाली नाही तर आगामी निवडणूक जड जाऊ शकते या विचाराने नगरसेवकांच्या तोंडाला फेस आला होता. मात्र, आता हा विकास निधी मिळाल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला आहे.

लगीनघाई सुरू

पुढील वर्षात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत विकासकामांचा निधी वापरण्यासाठी नगरसेवकांची लगीनघाई सुरू आहे. त्यातच हा निधी खात्यातून गायब झाल्याने आणि त्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. आयुक्तांनी स्थायी समितीने मंजूर केलेला निधी थांबवला कसा असा सवाल उपस्थित केला जात होता. तर प्रशासनाने नगरसेवकांचा विकास कामांचा निधी पुन्हा नगरसेवकांना वापरण्यासाठी खुला केला आहे, असं स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

कॅगकडे तक्रार

मुंबईतील विकास कामांसाठी निधी वाटप करताना स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभाग क्रमांक २०९ मध्ये ३३ कोटी त्यापैकी ज्यूटच्या पिशव्यांसाठी दीड कोटी, ३० खाद्य आणि भाजी ट्रकसाठी ५ कोटी, व्यायाम शाळा साहित्यासाठी २ कोटी, संगणकासाठी १ कोटी आणि अन्य अवाजवी निधीची तरतूद केली आहे. याबाबत भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा यांनी कॅगला लेखी तक्रार करून सदरबाबत महापालिका निधीचा नियमबाह्य दुरुपयोग आणि केवळ एकाच प्रभागात मतदारांना चुकीच्या पद्धतीने मोफत गोष्टींचे वितरण करणे याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. (bmc release 390 cr development fund for corporators)

 

संबंधित बातम्या:

…तर लोकलसंदर्भातही पुन्हा एकदा मोठा निर्णय घ्यावा लागेल, अतिरिक्त पालिका आयुक्तांचे सूतोवाच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार; अजित पवारांचे संकेत

Jalgaon accident | तब्बल 11 जणांची अंत्ययात्रा एकाच वेळी, भीषण अपघाताने जळगाव सुन्न

(bmc release 390 cr development fund for corporators)