VIDEO: बीचवर गाडी पार्क करण्याची चूक नडली; भरतीनंतर स्कॉर्पिओ भाईंदरच्या समुद्रात

समुद्रकिनारी आल्यानंतर या तरुणांनी बिनाधास्त गाडी तेथेच पार्क करुन ते फिरायला निघून गेले. | Car Drown in uttan beach

VIDEO: बीचवर गाडी पार्क करण्याची चूक नडली; भरतीनंतर स्कॉर्पिओ भाईंदरच्या समुद्रात
समुद्रकिनारी आल्यानंतर या तरुणांनी बिनाधास्त गाडी तेथेत पार्क करुन ते फिरायला निघून गेले. थोड्यावेळानंतर समुद्राला भरती आल्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली.
| Updated on: Mar 10, 2021 | 9:17 AM

भाईंदर: भाईंदरच्या उत्तान समुद्रकिनाऱ्यावर एक गाडी समुद्रात बुडाल्याचा (Car Drown) प्रकार समोर आला आहे. तरुणांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समजते. मंगळवारी संध्याकाळी हे तरुण स्कॉर्पिओ गाडीने उत्तन समुद्रकिनाऱ्यावर फिरायल आले होते. समुद्रकिनारी आल्यानंतर या तरुणांनी बिनाधास्त गाडी तेथेच पार्क करुन ते फिरायला निघून गेले. थोड्यावेळानंतर समुद्राला भरती आल्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली. ही गोष्ट तेथील लोकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी अग्शिशमन दलाला कळवले. अग्शिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ही गाडी समुद्रातून खेचून बाहेर काढली. (Car drown at Uttan beach in bhayandar)

दरम्यान, ही गाडी नेमकी कोणाची होती, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच संबंधित तरुणांवर पोलिसांनी कोणती कारवाई केली का, हेदेखील अद्याप समजलेले नाही.

वसईच्या समुद्रात बुडालेली स्विफ्ट अखेर जेसीबीच्या मदतीने बाहेर

काही दिवसांपूर्वी वसईतही एक स्विफ्ट कार समुद्रात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला होता. भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्ती गाडी पार्क करुन निघून गेला होता. पहाटे समुद्राला भरती आल्यानंतर ही गाडी आत खेचली गेली. समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटरवर खोल समुद्रात कार अडकली होती. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत होती. फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे कठीण जात होते. अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने ही कार बाहेर काढली होती.

अक्सा समुद्रकिनाऱ्यावर सापडला महिलेचा मृतदेह

मालाडच्या अक्सा समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिकच्या गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. काही दिवसांपूर्वी मालवणी पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी महिलेच्या सासऱ्यासह तिघांना अटक केली होती.

या महिलेचे नाव नंदनी रॉय असून तिने प्रेमविवाह केला होता. मात्र, ही गोष्ट तिच्या सासऱ्यांना आवडली नव्हती. त्यामुळेच सासऱ्यांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत कोंबून अक्सा समुद्रकिनाऱ्यावर टाकून दिला होता.

इतर बातम्या:

VIDEO | किनाऱ्यावर कार लावून फेरफटका महागात, भरती आल्यामुळे लाटेसोबत स्विफ्ट समुद्रात

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर

(Car drown at Uttan beach in bhayandar)