शिवसेना भवनाबाहेर बर्निंग कारचा थरार, घातपात की अपघात? चर्चांना उधाण

मुंबईत शिवसेना भवनाबाहेर (Shiv Sena) एक मोठी घटना घडलीय. शिवसेना भवनाबाहेर उभ्या असलेल्या एका कारला भीषण आग लागली.

शिवसेना भवनाबाहेर बर्निंग कारचा थरार, घातपात की अपघात? चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 4:49 PM

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संपूर्ण देशभरातील नागरिकांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे खिळल्या असताना मुंबईत (Mumbai) एक अनपेक्षित घटना समोर आलीय. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर (Shiv Sena) एक मोठी घटना घडलीय. शिवसेना भवनाबाहेर उभ्या असलेल्या एका कारला भीषण आग लागली. संबंधित घटना ही शिवसेना भवन परिसरात घडल्याने या घटनेकडे जास्त गंभीरतेने पाहिलं जात आहे. कारला आग नेमकी कशी लागली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण ही आगीची घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. या आगीत कारचा मधला भाग जळून खाक झालाय. आगीचं दृश्य हे काळजाचं थरकाप उडवणारं असंच आहे.

संबंधित कार ही शिवसेना भवनाच्या समोरच पार्क करण्यात आली होती. या गाडीला आग लागताच एका बाजूची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित कारचे दरवाजे आणि बोनेट उघडे होते. ही कार रस्त्याच्या कडेला उभी होती.

वाहतूक थांबवली

संबंधित गाडी ही नेमकी कुणाची होती ते अद्याप समजू शकलेलं नाही. गाडीला आग लागल्यानंतर प्लाझा थिएटरकडून दादर शिवाजी पार्कच्या दिशेला जाणारा रस्ता थांबवण्यात आला.

स्थानिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न

गाडीला आग लागताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. पण अग्निशमन दलाची गाडी योग्यवेळी पोहोचू शकली नाही. विशेष म्हणजे स्थानिकांनी देखील आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण आग विझण्याच्या ऐवजी वाढतच गेली.

आदित्य ठाकरे यांची बैठक सुरु असतानाच घटना

शिवसेना भवनाच्या आगदी हाकेच्या अंतरावर संबंधित घटना घडली. या घटनेवेळी गाडीमधून स्फोटाचा देखील आवाज ऐकू आला.

विशेष म्हणजे शिवसेना भवनमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पक्षनेत्यांसोबत बैठक सुरु असताना शिवसेना भवनाबाहेर संबंधित घटना घडली.

गाडीला आग लागल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमलेली होती. अखेर बऱ्याच वेळानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नात त्यांना यश आलं.

ही आग विझवण्यासाठी स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका निभावली. आग विझल्यानंतर धुराचे देखील लोट बघायला मिळाले.

गाडी नेमकी कुणाची?

संबंधित गाडी ही नेमकी कुणाची होती? ती गाडी नेमकी तिथेच का उभी होती? ती गाडी तिथे उभी करण्यामागे काही हेतू होता का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणी काय तपास करतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.