AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! भाजपच्या 27 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त… बड्या नेत्याच्ंया दाव्याने खळबळ

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या २७ आणि शिंदे गटाच्या ९ नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. १६ ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे पद धोक्यात असताना, राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर जात पडताळणी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी ! भाजपच्या 27 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त... बड्या नेत्याच्ंया दाव्याने खळबळ
mumbai corporationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 12:21 PM
Share

ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील 16 नगरसेवकांचं पद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या 16 नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रांना कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वेगळाच आणि धक्कादायक दावा केला आहे. भाजपच्या 27 नगरसेवकांचे आणि शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

भाजपच्या 27 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त. असं सांगतानाच विशाखा राऊत यांच्यासमोर दुसऱ्या नंबरवर असलेल्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही वादग्रस्त आहे. या व्यक्तीने कुडाळ किंवा कोकणातून जातप्रमाणपत्र आणलंय. त्याची सखोल चौकशी केल्यास त्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही रद्द होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीस, शिंदेंचे फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: जात पडताळणी अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फोन करत आहेत. याचं वाचवा आणि याचं रद्द करा, असं सांगण्यासाठी मुख्यमंत्री फोन करत आहेत. कुणाचं जात प्रमाणपत्र वैध आणि कुणाचं नाही? हे सांगण्यासाठी मिंधे फोन करत आहेत. राज्यात सध्या या लेव्हलला राजकारण सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

तुम्ही मेलंच पाहिजे

शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांसोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोण विधीज्ञ? या देशात एकच विधीज्ञ होते. पहिले होते मोतीलाल नेहरू. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर नाथ पै. असे काही विधीज्ञ आहेत का? किल्ला कोर्टाबाहेर विधीज्ञांची फौज असते. कुणी जर फोटोसाठी उपोषणाची धमकी देत असेल तर उपोषण करून तुम्ही मेले पाहिजे. तुम्ही कलंक आहात. तुम्ही या धरतीला भार आहात. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला स्वाभिमान दिला. त्यांच्या विषयी घृणा वाटत असेल तर फडणवीस यांनी त्यांच्या इच्छा मरणाचा अर्ज मान्य करावा. ते शिवसेना भवन आहे. तिथे शिवाजी महाराजांचा सन्मान होत असतो. जय शिवाजी आणि जय भवानी ही घोषणा शिवसेनेने आणली आहे, असं राऊत म्हणाले.

हिंदू खतरे मे नाही

यावेळी त्यांनी हिंदूंना कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. हिंदू खतरे में नाही. हिंदू सुरक्षित आहेत. कोण म्हणाले हिंदूंना खतरा आहे? मोदी आहेत ना? प्रति हिंदुहृदयसम्राट आहेत ना ते? महाराष्ट्रात काही चिल्लर हिंदू हृदयसम्राट आहेत. ते सांगतात म्हणून हिंदू खतरे में नाही येत. हिंदुंवर जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने बलिदान दिलं. आमच्यावर खटले आहेत. तुमच्यावर कोणते खटले आहेत? हिंदू सुरक्षित आहे. काल पुण्यात रस्त्यावर उतरले ते हिंदूत्ववादी आहेत. त्यांना हिंदुत्वाचं रक्षण करायचं आहे. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरले आहेत. मिंधे आणि त्यांच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?