AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा'
मराठा मोर्चा
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 07, 2020 | 4:40 PM
Share

मुंबई: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकून काढावा, अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल, हा समज चुकीचा आहे. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. (Haribahu Rahtod on Maratha Reservations)

ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. वटहुकूम काढल्यानंतर संसदेत घटनादुरूस्ती करावी लागेल. यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला हरिभाऊ राठोड आणि मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष युसूफ मणियार हेदेखील उपस्थित होते.  छत्रपती संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे आता या बैठकीअंती मराठा समाजाचे नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीराजेंची राज्य सरकारवर टीका

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज नवी मुंबईत मराठा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. मराठा समाजाला सरकारने फसवलं. राज्य सरकार त्यांच्या हातात असलेल्या गोष्टीही करत नाही. सारथी संस्था सुद्धा तुम्ही बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला काय दिलं?, फक्त राज्य सरकारने खेळखंडोबा केला, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.

संबंधित बातम्या:

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी; संभाजीराजेंची हजेरी!

(Haribahu Rahtod on Maratha Reservations)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...