
कधी ओव्हहेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड तर कधी रेल्वे रुळाला तडे अशा विविध कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी आता हे सवयीचच झालं आहे. ऐन गर्दीच्यावेळी असा काही बिघाड झाल्यास प्रवाशांचे खूप हाल होतात. लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकल प्रवासात काही मिनिटांचा उशीर एखाद्याचं दिवसाच वेळापत्रक बिघडवण्यासाठी पुरेसा ठरतो. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना लोकल सेवा वेळेतच हवी असते. पण मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता समस्यांमुळे होणाऱ्या विलंबाची सवय झाली आहे.
आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कामावर निघालेल्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत. कर्जत-बदलापूर दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दररोज कर्जत-बदलापूरवरुन मोठ्या संख्येने प्रवासी नोकरीसाठी मुंबईत येत असतात.
Mumbai Pune Intercity express stand still for past 20 minutes between Thakurli & Kalyan.. no announcement.. what is the issue? @IRCTCofficial @Central_Railway @RailMinIndia @RailwaySeva
— Prasad Sawant (@thodasaPrasad) July 30, 2025
कर्जत बदलापूर लोकल सेवा सुरळीत
वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर गेले होते तडे. रेल्वे रुळावर तडे गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र आता रेल्वे प्रशासने रेल्वे रूळ दुरुस्त करत लोकल सेवा सुरळीत केली आहे. पहिली लोकल cst कडे रवाना.
प्रवाशांची मोठी गर्दी
पहाटे 6:40 च्या सुमारास बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाल्याची माहिती आहे. रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरु केलं आहे. आज प्रवाशांना वेळेवर कार्यालय गाठता येणार नाही. त्यामुळे लेट मार्कची भिती आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचा संताप झाला आहे. काही एक्सप्रेस गाड्यांनाही यामुळे उशीर झाला आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याला सकाळी पाहणी करताना हा तडा आढळला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.