Mumbai Megablock: मुंबईकरांना रविवारी फिरायला जाताय? थांबा! पहिले ही बातमी वाचा, आज रात्रीपासूनच…

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. त्यामुळे ही बातमी वाचूनच रेल्वेने प्रवास करा. आज रात्रीपासूनच विक्रोळी-मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक.

| Updated on: Feb 14, 2026 | 5:04 PM
1 / 6
Mumbai : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील पादचारी उड्डाणपुलाच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत 6 मीटर रुंदीचे चार मोठे गर्डर रोड क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात येणार आहेत.

2 / 6
हे काम सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1.05 वाजल्यापासून ते पहाटे 4.35 वाजेपर्यंत विक्रोळी ते मुलुंड दरम्यान विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

3 / 6
ब्लॉकमुळे काही स्थानिक गाड्यांवर परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ठाणे ही लोकल 15 फेब्रुवारी रोजी CSMT येथून रात्री 12.24 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. ठाणे – CSMT ही लोकल 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.04 वाजता ठाणे येथून सुटणारी लोकलही रद्द राहील.

4 / 6
CSMT – कर्जत ही लोकल 15 फेब्रुवारी रोजी CSMT येथून रात्री 12.12 वाजता सुटणारी लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

5 / 6
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की प्रवासापूर्वी गाड्यांच्या वेळापत्रकाची खातरजमा करावी. ब्लॉकदरम्यान काही गाड्या रद्द किंवा वळविण्यात येणार असल्याने प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे.

6 / 6
कांजूरमार्ग स्थानकावरील पादचारी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा अधिक वाढणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.