उद्या ‘संडे ब्लॉक’ कुठे आणि किती वाजता, घरातून निघण्याआधी नजर टाका

मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे दर रविवारी मेगाब्लॉक घेत असते. या ब्लॉक काळात लोकलच्या फेऱ्या मर्यादीत तसेच विलंबाने धावत असल्याने गाड्यांना प्रचंड गर्दी असते...

उद्या संडे ब्लॉक कुठे आणि किती वाजता, घरातून निघण्याआधी नजर टाका
mega block news
| Updated on: May 17, 2025 | 4:35 PM

उपनगरीय लोकल उर्वरित आठवडाभर सुरळीत चालण्यासाठी तिन्ही मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीची कामे रविवारी काढली जातात. त्यामुळे रुळांची डागडुजी करायला वेळ मिळतो. उद्या रविवार दि.१८ मे रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मात्र दिवसा मेगाब्लॉक नसून तो २०/२१ मे २०२५ च्या मध्यरात्री  घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसणार आहे. हुश्य…वाटले असेल ना…मात्र मध्य आणि हार्बरची स्थिती जाणून घ्या…

रविवार, १८ मे २०२५ रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही. कारण २०/२१ मे २०२५ च्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी मंगळवार-बुधवार मध्यरात्री म्हणजे २०/२१ मे २०२५ रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान सकाळी ००:३० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस रिलीजनुसार, या रात्रकालीन ब्लॉक कालावधीत, विरार-वसई रोड ते बोरिवली-/भाईंदर स्थानकादरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर वळविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी दि.१८ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसाचा कोणताही ब्लॉक नाहीए…हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दपर्यत उद्या रविवार दि.१८ मे रोजी ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याणच्या जलद मार्गावर अप आणि डाऊन दिशेला सकाळी 10.40 ते 3.40 पर्यत ब्लॉक असणार आहे.