मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत.

मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?
सोमवारी शासकीय सुट्टी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 6:23 PM

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. या संदर्भात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटेकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे, या पत्रिपत्रकानुसार सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालय बंद असणार आहेत.

शासन परिपत्रक, दिनांक 9/ 12/2025 अन्वये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी घोषीत करण्यात आली होती. तद्नंतर शासन सुद्धीपत्रक दिनांक 10/08/ 2026 अन्वये गोपाळकाला (दहिहंडी) दिनांक 05/09/2026 रोजीची सुट्टी शनिवार साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येत असल्याने सदर सुट्टी रक्षाबंधन दिनांक 28/08/2026 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार सन 2026 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने सोमवार दिनांक 09 नोव्हेंबर 2026 रोजी तिसरी स्थानिक सुट्टी (LOCAL HOLIDAY) जाहीर करण्यात आला आहे.

Loading...

हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील. सदर स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी -13/||/ बी , पाच नोव्हेंबर 1958 मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे, असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us