कितीही विरोध करा, मराठ्यांना आरक्षण देणारच : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला, तरी मराठा समाजाला आरक्षण देणारच, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. मराठा आरक्षणावरुन आजही हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं. विधानसभेच्या सभागृहात विरोधकांनी मराठा आरक्षणाचा अहवाल मांडण्याची मागणी लावून धरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. […]

कितीही विरोध करा, मराठ्यांना आरक्षण देणारच : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला, तरी मराठा समाजाला आरक्षण देणारच, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. मराठा आरक्षणावरुन आजही हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं. विधानसभेच्या सभागृहात विरोधकांनी मराठा आरक्षणाचा अहवाल मांडण्याची मागणी लावून धरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ असतानाही मुख्यमंत्री फडणवीस कमालीचे आक्रमक होत, मोठ्या आवाजात सरकारची बाजू मांडत होते.

आतापर्यंत आरक्षणासंदर्भात 52 अहवाल आले. मराठा समाजाचा हा अहवाल 52 वा आहे. आतापर्यंतचे 51 अहवाल सभागृहात मांडण्यात आले नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या अहवाल सभागृहात मांडण्याच्या मागणीला उत्तर दिले. तसेच, मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “कलम 9 आणि 11 नुसार अहवाल सभागृहात मांडणं बंधनकारक नाही. फक्त शिफारशी स्वीकारल्या की नाही, हे सांगायचे असते.”

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे :

  • विरोधक मतांचं राजकारण करत आहेत, त्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही तर केवळ मुस्लिम समाजातील काही जातींना आरक्षण दिलं – मुख्यमंत्री
  • मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार, मराठा आरक्षणासाठी सरकार बांधिल – मुख्यमंत्री
  • विधेयक मांडण्यापूर्वी ATR मांडणार, ओबीसींच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लावणार नाही- मुख्यमंत्री
  • मराठा आरक्षणाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार, ओबीसीला धक्का लागणार नाही – मुख्यमंत्री
  • मागासवर्ग आयोगाचा हा 52 वा अहवाल आहे, यापूर्वी एकही अहवाल सभागृहात ठेवला नाही, मुख्यमंत्री
  • मराठा आरक्षणाचं विधेयक सभागृहात आणण्याआधी, एटीआर सभागृहात मांडणार – मुख्यमंत्री
  • आरक्षणावरील हा 52 वा अहवाल असून, आतापर्यंतचे 51 अहवाल सभागृहात मांडण्यात आले नाहीत – मुख्यमंत्री
  • राज्य सरकार नियमानेच काम करतंय – मुख्यमंत्री