Chitra Wagh : भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलं तरी कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार, चित्रा वाघांचा सेनेवर पलटवार पण सोशल मीडियावर झाल्या ट्रोल!

चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर केलेली टीका काही सर्वसामान्यांना रुचलेली दिसत नाही. ट्विट केल्यानंतर चित्रा वाघ ट्रोल होताना दिसत आहे.

Chitra Wagh : भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलं तरी कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार, चित्रा वाघांचा सेनेवर पलटवार पण सोशल मीडियावर झाल्या ट्रोल!
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 21, 2022 | 10:27 AM

मुंबई : पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने मागील अडीच वर्षात पाहिले आहे, असा पलटवार भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. ट्विट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅायला मंत्री केले आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. पुत्रप्रेम संपत नव्हते अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडले. शेवटी पक्षातच महाभारत घडले. आता तरी धृतराष्ट्राने डोळ्यावरची पट्टी काढावी. डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना लगावला आहे.

‘शिवसेनेकडून फडणवीसांच्या पाठीत वार’

भाजपाच्या मेळाव्यात काल शिवसेनेवर भाजपाने टीका केली होती. त्याला शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिले होते. आता या वादाच चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसाने आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केले आहे. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार. नुकतेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावे, अशी टीका त्यांनी केली आहे.

सुषमा अंधारेंनी केली होती टीका

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या टिकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांची कीव करावीशी वाटते, असे म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या प्रेमापोटी आंधळे झालेले धृतराष्ट्र आहेत, असा हल्लाबोल केला होता. सत्तेच्या लालसेने गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत पलटवार केला आहे.

चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

चित्रा वाघ ट्रोल

चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर केलेली टीका काही सर्वसामान्यांना रुचलेली दिसत नाही. ट्विट केल्यानंतर चित्रा वाघ ट्रोल होताना दिसत आहे. ज्यांच्यावर चित्रा वाघ यांनी सातत्याने आरोप केले ते संजय राठोड तसेच पती किशोर वाघ यांच्यावरून सोशल मीडियावर त्या ट्रोल होत आहे.