मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोची उद्या 4 हजार 466 घरांची लॉटरी जाहीर होणार

| Updated on: Nov 09, 2020 | 10:33 PM

सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 4 हजार 466 घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार आहे (CIDCO will declare lottery of mumbai police scheme).

मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोची उद्या 4 हजार 466 घरांची लॉटरी जाहीर होणार
Follow us on

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 4 हजार 466 घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या कार्यालयातून उद्या दुपारी 12 वाजता 4 हजार 466 घरांची संगणकीय सोडत जाहीर होणार आहे (CIDCO will declare lottery of mumbai police scheme).

सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै 2020 रोजी करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत 4 हजार 466 घरे (सदनिका) पोलीस कर्मचार्‍यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आली होती. या गृहनिर्माण योजनेअंतर्गत पोलीस कर्मचार्‍यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये 4 हजार 466 सदनिका साकारण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणार्‍या या योजनेतील सदनिका या केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांकरिताच राखीव आहेत. एकूण 4 हजार 466 सदनिकांपैकी 1 हजार 57 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि 3 हजार 409 या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. 27 जुलै 2020 पासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन सदर योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला. अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इत्यादी सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या.

या सोडतीचे https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर वेबकास्टींगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्याही निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच निकालाविषयीची अद्ययावत माहितीही सदर संकेतस्थळावर पाहता येणार आहे (CIDCO will declare lottery of mumbai police scheme).