अभिजीत दीपकेच्या CJP ला आंदोलनाआधीच स्थानिक शिवाजीपार्ककरांनी दिला दणका, थेट पोलीस स्टेशनमध्येच…

Locals Object to CJP Protest at Shivaji Park: एक मोठी बातमी समोर आली आहे. २ ऑक्टोंबरआधीच सीजेपीच्या शिवाजी पार्कातील आंदोलनावर संकट ओढावलं आहे.

अभिजीत दीपकेच्या CJP ला आंदोलनाआधीच स्थानिक शिवाजीपार्ककरांनी दिला दणका, थेट पोलीस स्टेशनमध्येच...
| Updated on: Sep 29, 2026 | 7:29 PM

कॉकरोच जनता पक्षाने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी देशभरातील तरुणांना आमंत्रित केले आहे. अभिजित दीपके यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “चला मुंबईला जाऊया” असे पोस्ट केले आहे. हे आंदोलन गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी ४ वाजता होणार आहे. मात्र याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे हे आंदोलन होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दादर शिवाजी पार्क येथील कॉकरोच जनता पार्टीच्या होणाऱ्या आंदोलनाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. दादर शिवाजी पार्क या ठिकाणी येत्या 2 ऑक्टोबर ला सीजेपीचे आंदोलन होणार आहे. यासाठी सीजेपीचे काही पदाधिकारी दादर शिवाजी पार्क ठिकाणी उपस्थित होते. त्यांना स्थानिकांनी हटकल्याचे पाहायला मिळाले आहे. जर का आंदोलन केले तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक रहिवासी आणि सीजेपी समन्वयकांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही गटांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading...

यामुळे आता सीजेपीच्या शिवाजी पार्कातील आंदोलनावर संकट आले आहे. स्थानिकांनी विरोध दर्शवत आक्षेप नोंदवला आहे. यामुळे आता हे आंदोलन होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, पालिकेच्या परवानगीचा अभाव आणि वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता या कारणांवरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारल्यानंतर अभिजीत दीपकेंनी ‘जेल भरो आंदोलन’ची घोषणा केली आहे. अभिजीत दीपकेंनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, लोकशाही वाचवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असेल. आम्ही शांततापूर्ण आंदोलन करू. मुंबईच्या तुरुंगांमध्ये किती जागा उपलब्ध आहे ते आम्ही पाहू. लोकशाहीशी छेडछाड केल्याबद्दल ज्ञानेश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या देशाची मुले देशाची लोकशाही संपू देणार नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us