Covid vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा, महाराष्ट्राला 20 कोटी लशींची गरज

| Updated on: Apr 22, 2021 | 11:24 AM

महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. | CM Uddhav Thackeray Adar Poonawala

Covid vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा, महाराष्ट्राला 20 कोटी लशींची गरज
अदर पुनावाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मुभा दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. (CM Uddhav Thackeray talk with Adar Poonawalla for Covid 19 vaccine)

प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे आता सीरम महाराष्ट्राला किती वेगाने लसी उपलब्ध करुन देणार, हे पाहावे लागेल.

सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अशातच आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला 50 टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने आता महाराष्ट्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

‘केंद्र सरकारने लस घ्यायला परवानगी दिली पण महिनाभराचा साठा बूक केला’

केंद्र सरकार कोरोना लसींच्या वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात येतो. आता 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला मुभा दिल्यानंतर केंद्र सरकारने 50 टक्के लसींचा साठा खरेदी करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. त्यामुळे आता राज्यांना कोव्हीशिल्डचे उत्पादन करणारी सिरम आणि कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी थेट बोलावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सिरमच्या अदर पुनावालांशी संपर्क साधून लस पुरवण्याची मागणी केली. तेव्हा अदर पुनावाला यांनी 24 मे सिरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्र सरकारने अगोदरच बूक करून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला सिरम इन्स्टिट्यूटकडून थेट लसी घेण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या : 

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका

‘पंतप्रधान मोदींच्या मनात आकस नाही, पण भाजपमधील ‘शुक्राचार्यांच्या’ राजकारणामुळे महाराष्ट्राच्या मदतीत अडथळे’

Maharashtra Corona Update : चिंतेत वाढ; गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू, 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण

(CM Uddhav Thackeray talk with Adar Poonawala for Covid 19 vaccine)