तुमच्या निष्काळजीपणामुळेच लसीकरण होऊनही कोरोना फैलावतोय; उच्च न्यायालयाने नागरिकांना फटकारले

| Updated on: Oct 26, 2021 | 7:07 AM

व्यापक जनहितासाठी सरकारने निर्बंध घातले तर त्यात काही गैर नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्याकडेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने लक्ष वेधले. लसीकरणाच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही

तुमच्या निष्काळजीपणामुळेच लसीकरण होऊनही कोरोना फैलावतोय; उच्च न्यायालयाने नागरिकांना फटकारले
Follow us on

मुंबई: मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊनही करोनाचा प्रादुर्भाव होण्यामागे विशेषत: सणासुदीनंतर कोरोना रुग्ण वाढण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूतत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. लोकल प्रवासासाठी लसीकरण सक्तीचे करण्याला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

व्यापक जनहितासाठी सरकारने निर्बंध घातले तर त्यात काही गैर नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्याकडेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने लक्ष वेधले. लसीकरणाच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही आणि त्यांच्यावर असे निर्बध घालणे हे नागरिकांच्या समानतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी लसीकरणानंतरही कोरोना अधिक झपाटय़ाने फैलावत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार

गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास आता जलद होणार आहे किंबहुना त्यांना इच्छित स्थळी इच्छित वेळी पोहोचता येणार आहे. कोरोनानंतर वाढलेल्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी, (ता.28) रोजी पासून चालविण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास खुला होता. त्यानंतर 15 ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांचा फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला केला. लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यानंतर दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली. तर, 18 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकूण 60 लाख 16 हजार प्रवाशांनी प्रवास केला.

संबंधित बातम्या:

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

Covid Updates:लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून विलगीकरण नाही; मात्र, आरटीपीसीआर रिपोर्ट हवाच

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही घसरण सुरु