राज ठाकरेंविरोधात बिहारमध्ये तक्रार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुझफ्फरपूर (बिहार) : मुंबईत आयोजित उत्तर भारतीय महापंचायतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या राष्ट्रभाषेच्या दर्जाबाबत भाष्य केले. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले होते. या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. आयपीसी कलम 295, 296 आणि 298 या अंतर्गत राज […]

राज ठाकरेंविरोधात बिहारमध्ये तक्रार
Follow us on

मुझफ्फरपूर (बिहार) : मुंबईत आयोजित उत्तर भारतीय महापंचायतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या राष्ट्रभाषेच्या दर्जाबाबत भाष्य केले. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले होते. या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
आयपीसी कलम 295, 296 आणि 298 या अंतर्गत राज ठाकरेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, जर या कलमाअंतर्गत राज ठाकरे दोषी आढळल्यास त्यांना एक किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा एकत्रित होऊ शकतात.
हिंदी भाषेचा अपमान केल्याचा आरोप तम्ना हाशमी यांनी तक्रारीत केला आहे. तसेच, हिंदी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे, असा आरोप तमन्ना हाशमी यांनी केला आहे. शिवाय, राज ठाकरेंनी संपूर्ण देशाचा अपमान केल्याचेही तमन्ना हाशमी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंविरोधातील या प्रकरणावर 12 डिसेंबर 2018 रोजी सुनावणी होणार आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
“हिंदी खूप सुंदर भाषा आहे. त्यात काहीच शंका नाही. मात्र, हिंदी राष्ट्रभाषा आहे, हे चूक आहे. कारण राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही. मी जे बोलतोय, ते तुमच्याकडे इंटरनेट आहे किंवा आणखी काही, तुम्ही जाऊन पाहू शकता. जशी हिंदी, तशीच मराठी, तशीच तामिळ भाषा आहे, तशीच गुजराती भाषा. या सगळ्या देशाच्या भाषा आहेत.”, असे राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमातील भाषणात म्हणाले.
VIDEO : राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण :