“आम्हाला सरकारी घर नको”, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील याची भूमिका, सर्वसामान्यांकडून कौतुक

| Updated on: Mar 25, 2022 | 7:09 PM

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मला सरकारी घर नको, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. या दोघांच्याची विधानाचं सध्या सर्वसामान्यांकडून स्वागत होतंय.

आम्हाला सरकारी घर नको, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील याची भूमिका, सर्वसामान्यांकडून कौतुक
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, मनसे आमदार राजू पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांसाठी मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा काल विधानसभेत केली. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे. काँग्रेस (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी “मला सरकारी घर नको”, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. या दोघांच्याची विधानाचं सध्या सर्वसामान्यांकडून स्वागत होतंय.

प्रणिती शिंदे यांची भूमिका

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्याला सरकारी घर नको अशी भूमिका घेतली आहे. “माझं मुंबईत घरी आहे. त्यामुळे मला हे सरकारी घर नको. विनाकारण सरकारी मालमत्ता अडवून ठेवण्यात अर्थ नाही. माझ्यासारख्याच काही आमदारांचं मुंबईत घर त्या आमदारांना घर नको आहे. त्याचे जे पैसे आहेत तर ग्रामिण भागातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या सर्व सामान्य लोकांसाठी वापरावेत”, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय.

राजू पाटील काय म्हणाले?

मनसेचे विधानसभेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही सरकारी घर न घेण्याची भूमिका घेतली आहे. “मला सरकारी घर नको. आमदारांना मोफत घरं कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा”, असं राजू पाटील म्हणाले आहेत. शिवाय आपला “आमदारकीचा पगारही आपण सर्वसामान्यांना देतो पण त्याचा मी कुठेही गाजावाजा करत नाही”, असं ते म्हणाले आहेत.

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही “मी माझ्या भावाला सरकारी घर घेऊ नकोस” , असं सांगितल्याचं म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांची घोषणा काय?

महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरं देणार असल्याचं जाहीर केलं. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरं देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

संबंधित बातम्या

Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्राच्या एकाचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स गेला, दुसरा तयार होत होता, फडणवीसांकडे बघत अजित पवारांकडून हसत हसत फिरकी

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर