AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्राच्या एकाचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स गेला, दुसरा तयार होत होता, फडणवीसांकडे बघत अजित पवारांकडून हसत हसत फिरकी

पश्चिम महाराष्ट्रवाला 20 वर्षे मिळालं तर महाठवाडा आणि विदर्भाला तर तब्बल 32 वर्षे मुख्यमंत्रपद मिळालं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रातून कोणी मुख्यमंत्री झालं नाही. यावरूनच अजित पवारांनी भाजपला पुन्हा डिवचलं आहे.

Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्राच्या एकाचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स गेला, दुसरा तयार होत होता, फडणवीसांकडे बघत अजित पवारांकडून हसत हसत फिरकी
अजित पवारांची फडणवीसांना कोपरखिळीImage Credit source: Vidhansabha
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 25, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई : अधिवेशनाचा गुरूवारचा दिवस फडणवीसांनी  (Devendra Fadnavis) तुफान आरोप करत गाजवला. मात्र त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पावारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांच्या आरोपांचा समार घेऊन मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) बसले. मग लगेच अजित पवार (Ajit Pawar) बोलायला उभा राहिले. अजित पवारांनीही फडणवीसांना जोरदार कोपरखिळ्या मारल्या. उत्तर महाराष्ट्रला अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. कोकणाला दहा वर्षे मिळालं, पश्चिम महाराष्ट्रवाला 20 वर्षे मिळालं तर मराठवाडा आणि विदर्भाला तर तब्बल 32 वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रातून कोणी मुख्यमंत्री झालं नाही. यावरूनच अजित पवारांनी भाजपला पुन्हा डिवचलं आहे. त्यांनी खडसे आणि गिरीश महाजन यांचं नाव न घेता भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

खडसेंचा त्यावेळी चान्स गेला

ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र खडसेंना त्यावेळी डावलून महसूल मंत्रीपद देण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाची माळ तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली. त्यामुळे खडसेंचा चान्स थोडक्यात हुकला. नंतर आरोप झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. अजित पवारांनी हेच नाव न घेता विधानसभेत हसत हसत बोलून दाखवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातला दुसरा चर्चेतला नेता म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन एकेकाळी भाजपचे संकमोचक म्हणून ओळखले जायचे. अजित पवारांनी नाव न घेता त्यांच्याकडेही इशारा केला आहे.

फडणवीसांनी दिल्लीच्या राजकारणात जावं

उत्तर महाराष्ट्रातून एकाच चान्स गेला असला तरी दुसरा नेता तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस दिल्लीतल्या राजकारणात गेल्याशिवाय त्यांना राज्यात संधी मिळणार नाही. त्यामुळे फडणवीसांनी दिल्लीच्या राजकारण जावं. मग विरोधी पक्षनेते म्हणून कसे बोलतात, कसे वागतात हे कळेल, म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजनांकेड इशारा केला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आधी महाजन खडसे ही जोडगोळी एकाच पक्षात म्हणजे भाजपात होते. मात्र खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि खडसे महाजन यांच्यातला छुपा संघर्ष खुल्यापणे बाहेर आला. आता भाजपकडून उत्तर महाराष्ट्राची बाजू मांडण्यात गिरीश महाजन पुढे असतात.

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर

CM Udhav Thackrey: पहाटेचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर, मलिक-देशमुखांचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना