AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता- संजय राऊत

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे जीव वाचला असता असे म्हटले आहे.

Sanjay Raut : मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता- संजय राऊत
Gopinath Mundhe and Sanjay RautImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 11:15 AM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, मुंडे यांच्याबाबत एक गंभीर आरोप समोर आला आहे. असे म्हटले जात आहे की भाजपमध्ये असताना त्यांना छळ सहन करावा लागला होता. मानसिकदृष्ट्या सतत त्रास दिला जात होता आणि मानसिक आघातही केले जात होते.

काय म्हणाले संजय राऊत?

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, गोपिनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाला होता. मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता. मानसिक आघात केले जात होते. आम्ही दिल्लीत होतो. ते पवारांना भेटले. ते सज्जन गृहस्थ होते. त्यांनी अशाप्रकारच्या पक्षांतराला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना आहात, तिथे थांबण्यास सांगितलं होतं. काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते असे म्हटले आहे.

“हे सर्व इडियटचं कॅबिनेट आहे”

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली आहे. ‘लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचं टेलीप्रॉम्पटर बंद झालं. त्यावेळी वाचता येत नव्हतं. माझ्याकडे पूर्ण क्लिप आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यावर पंतप्रधान हे राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करत होते. लटपटले, घाम फुटला. त्यांच्याविषयी काय बोलाल. एका मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे विचारावं लागतं. त्यांचा स्वातंत्र्य दिनाशी काय संबंध आहे. नाशिकचे चंपतरायना… त्यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. सगळे इडियट लोक एकत्र करून सरकार चालवलं जात आहे. महाराष्ट्र आणि देशात शोधून शोधून इडियट शोधले जात आहे. त्यानंतर कॅबिनेट, राज्यमंत्री केलं जातं. हे सर्व इडियटचं कॅबिनेट आहे’ असे संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, काँग्रेसच्या अधिवेशनात रविंद्र टागोर यांनी वंदे मातरम गीत केलं. संघाच्या शिबीरात गीत नव्हतं. काँग्रेसने हे केलं आहे. इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरम हे दोन महाकाव्य आहेत. त्यातील वंदे मातरमची याची गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. सहा कडवी म्हणत गेले नाही. भगत सिंग, सुखदेव हे सहा कडवी म्हणत फासावर गेले नाही. फक्त वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद म्हणत फासावर गेले. भाजपच्या लोकांना यामुळेच इडियट म्हटलं जातं’

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी