AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: आमिर खान, पूर्व पत्नी किरण राव भावूक, मुलाच्या डोळ्यात अश्रू; नेमकं झालं तरी काय?

Aamir Khan: अभिनेता आमिर खान, त्याची पूर्व पत्नी किरण राव आणि या दोघांचा मुलगा आझाद यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तिघंही अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

| Updated on: Aug 16, 2026 | 10:46 AM
Share
अभिनेता आमिर खान त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांच्यासोबत मुंबईतील एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकबाहेर दिसला. यावेळचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत. यावेळी तिघंही अत्यंत भावूक दिसले. तर आमिर आणि किरण यांचा मुलगा आझाद अक्षरश: रडताना दिसला.

1 / 5
क्लिनिकमधून बाहेर पडताना आमिरच्या हातात पाळीव प्राण्यांसाठी वापरली जाणारी पेटी दिसली. आमिर आणि किरण खूपच व्यथित होते. तिघांना भावूक अवस्थेत पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आझादच्या पाळीव प्राण्यांपैकी एकाचा मृत्यू झाला असावा किंवा तो गंभीर आजारी असावा.

2 / 5
शनिवारी मुंबईत आमिर खान, किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद एका पेट क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसले. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. आमिरच्या हातात पाळीव प्राण्यांची पेटी होती आणि संपूर्ण कुटुंब तणावात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.

3 / 5
आझादला रडताना पाहून चाहतेही खूप व्यथित झाले. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. 'त्यांचा पाळीव श्वान किंवा मांजर आजारी असेल बहुतेक', असं एकाने लिहिलं. तर 'कदाचित त्यांच्या पाळीव प्राण्यांपैकी एकाचा मृत्यू झाला असावा', असा अंदाज दुसऱ्या युजरने व्यक्त केला.

4 / 5
या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत असून आमिर खान किंवा किरण राव यांच्याकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. एखाद्या पाळीव प्राण्यासोबत घट्ट भावनिक नातं निर्माण झाल्यानंतर जेव्हा तो कायमचा निघून जातो किंवा त्याला त्रास होतो, तेव्हा ते दु:ख मुलांना सहन करणं अत्यंत कठीण असतं. आझादच्या बाबतीतही असंच काहीसं घडल्याचं म्हटलं जात आहे.

5 / 5
Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...

दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर

छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक