“राज्यात आणि केंद्राच्या प्रश्नावर सरकार नापास”; काँग्रेसने सरकारला कुचकामी ठरवले…

| Updated on: Jun 03, 2023 | 6:36 PM

विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे या सरकारविरोधात आम्ही यांच्याविरोधात हाय कार्टात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यात आणि केंद्राच्या प्रश्नावर सरकार नापास; काँग्रेसने सरकारला कुचकामी ठरवले...
Follow us on

मुंबई : राज्यातील राजकारण विविध कारणामुले ढवळून निघत असतानाच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ते आणखी तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असतानाच खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही आता कालपासून लोकसभा निहाय आढावा घेतला असून 38 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे.

तसेच आणखी 10 मतदार संघांचा आढावा घेणार असून त्याचा आगामी काळात आम्हाला फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. या दोन्ही सरकारने फक्त विकासाच्या गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे ही दोन्ही सरकार राज्यात आणि केंद्राच्या प्रश्नांवर नापास झाल्याचे सांगितले आहे.

या सरकारकडून नवीन घोषणा दरवेळी करताना पाहायला मिळत आहे, मात्र त्या पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. या सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना गुलाम बनविण्यासाठी तीन काळे कायदेही या सरकारने आणले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं आंदोलन पाहायला मिळालं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली असली तरी त्याचा काडीमात्र फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

त्यामुळे या सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस पाहायला मिळत असा घणाघातही त्यांनी सरकारवर केला आहे. इमारतीच्या समुह पुनर्विकास योजना सुरु करण्यात आली आहे, मात्र काही विशिष्ट बिल्डाराना मदत करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे.

त्यामुळे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे या सरकारविरोधात आम्ही यांच्याविरोधात हाय कार्टात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सांगितले की, बारामतीमध्ये या मागील निवडणूकीत सुप्रिया सुळे काही ठिकाणी पिछाडीवर होत्या, मात्र त्या ठिकाणी आता आमचीही ताकद आहे. त्यामुळे मित्र पक्षाला आम्ही मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.