आधारकार्ड नसल्यास शाळा कॉलेजच्या आयकार्डवर लस मिळणार, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मेगाप्लॅन

| Updated on: Dec 29, 2021 | 12:59 PM

केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. मुंबईत 3 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार असून मुंबईत 9 लाख 22 हजार 516 मुले आहेत.

आधारकार्ड नसल्यास शाळा कॉलेजच्या आयकार्डवर लस मिळणार, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मेगाप्लॅन
कोरोना लसीकरण
Follow us on

मुंबई: 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा अ‌ॅक्शन प्लॅन तयार मुंबई महाालिकेनं तयार केला आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर कॉलेज, शाळेच्या ओळखपत्रावर लस मिलणार आहे. कॉलेज जवळील लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केलं जाणार आहे. लसीकरणावेळी डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात ठेवणार असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेच्यावतीनं देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. मुंबईत 3 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार असून मुंबईत 9 लाख 22 हजार 516 मुले आहेत.

वॉक ईन लसीकरणावर भर

मुलांचं लसीकरण करताना वॉक ईन लसीकरणावर भर दिला जाणार असला तरी कोविन अँपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच या मुलांच्या लसीकरणात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक वॉर्डातील कॉलेज जवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर लशीच्या मात्रा दिल्या जाणार आहेत. पालिका किंवा खाजगी लसीकरण केंद्रावर या मुलांचे लसीकरण करण्यापेक्षा कॉलेजच्या कॅम्पस मध्ये लसीकरण कॅम्प लावण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणा वेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम सुरु करण्याआधी 1500 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोवॅक्सिन लस देणार

लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस द्यावी, असे केंद्र सरकराने निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे 2 लाख 50 हजार डोस उपलबध आहेत. 9 लाख मुलांपैकी दिवसाला 30 हजार मुले आली तरी आठवडाभर पुरेल इतका लसीचा साठा आहे. त्यादरम्यान पुन्हा लसीचा साठा येऊन एका महिन्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते, असे सुरेश काकाणी यांनी संगितले.

कारागृहातील 15 ते 18 वयातील कैद्यांना मिळणार लस

विविध गुन्ह्यात कारागृहात असलेले कैदी यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. कैद्यांकडे आधार कार्ड नसल्याने कारागृहाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे ही सुरेश काकाणी म्हणाले. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

झोपडपट्टीतील मुलांनी सुरुवातीला लसीकरण केंद्रावर नोंदणी करत लस घ्यावी. त्यानंतर लशीच्या मात्रा अधिक उपलब्ध झाल्यास झोपडपट्टी परिसरात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे, असंही सुरेश काकाणी सांगितलं.

शाळांमध्ये लसीकरण करता येणार का?

केंद्र सरकारनं आता नवीन घोषणा केली. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीनं सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. भारत सरकारनं कोवॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं कोवॅक्सिन देण्यात येणार आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचं राजेश टोपे म्हणाले. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरनं माहिती दिलेली नाही. बुस्टर डोसचं लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्यानं तोपर्यंत आम्ही वाट पाहू, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या:

Corona Vaccine for Child : कॉलेजला या लस घ्या, मुंबई महापालिकेचा 9 लाख मुलांच्या लसीकरणासाठी मेगा प्लॅन

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लान; कधी, कुठे आणि किती जणांना मिळणार लस? वाचा सविस्तर

Corona Vaccine for Child BMC told if Aadhar Card not available then College and School ID card is accept for vaccination programme