Coronavirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

| Updated on: May 05, 2021 | 8:39 AM

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला साधारण 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. | Coronavirus in Mumbai

Coronavirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर
Covid
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 2554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. (Coronavirus Surges in Mumbai)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला साधारण 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 2500 येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे.

भारतात थैमान घालणारा कोरोनाचा म्युटंट नेमका कसा दिसतो, वाचा सविस्तर माहिती

ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना कारमध्येच लस

मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी दादरमधये विशेष सोय केली आहे. दादरच्या कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात आले आहे. मंगळवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर दिवसभरात 227 वाहनांमधून आलेल्या 417 ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले.

राज्यभरात गेल्या 24 तासांत 51880 नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात तीन लाख नमुने तपासल्यावर 51880 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात एवढय़ाच चाचण्या केल्यानंतर सरासरी 65 हजार रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या कमी आहे.

कोरोनाबाधितांची वारंवार RT-PCR टेस्ट नको, प्रवाशांसाठी गरज नाही, आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्स

कोरोना काळात टेस्ट करणाऱ्या प्रयोगळशाळांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे हा ताण कमी करावा यासाठी आरसीएमआरने कोविड टेस्ट संदर्भात महत्त्वपूर्ण सूचान जारी केल्या आहेत. “आंतरराज्यीय प्रवास करताना आता प्रवाशांना आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. यातून प्रयोगशाळांवरील भार उलट कमी होईल. त्यातूनच कोरोना संक्रमणाला रोखता येईल”, असं आरसीएमआरने म्हटलं आहे.

टेस्टिंगविषयी नेमक्या गाईडलाईन्स काय?

1) ज्या लोकांचा रिपोर्ट एकदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करु नये.

2) कोरोनापासून बरं झाल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

3) आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्यांसाठी आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याती आवश्यकता नाही.

संबंधित बातम्या:

चिंता वाढली! दक्षिण भारतात 15 पट अधिक संक्रामक नवा AP स्ट्रेन, महाराष्ट्रातही प्रभाव

मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळणार, पालिका लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर

(Coronavirus Surges in Mumbai)