सलूनवाला कोव्हिड योद्धा, ड्युटीवरील पोलीस, डॉक्टरांचे केस कटिंग करुन सेवा

| Updated on: Jun 20, 2020 | 12:50 PM

डोंगरी येथील सलूनचालक ड्युटीवरील डॉक्टर, पोलीस यांचे केस कटिंग करुन, आपल्या परीने कोरोना लढ्यात हातभार लावत आहेत. (Covid warrior barber)

सलूनवाला कोव्हिड योद्धा, ड्युटीवरील पोलीस, डॉक्टरांचे केस कटिंग करुन सेवा
Follow us on

मुंबई : कोरोनाशी समाजातील घटक वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत, तर पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. डॉक्टर आणि पोलिसांप्रमाणे आता एका सलून चालकाने सामाजिक भान जपत, आपली सेवा दिली आहे. ड्युटीवरील डॉक्टर, पोलीस यांचे केस कटिंग करुन, आपल्या परीने कोरोना लढ्यात हातभार लावत आहेत. (Covid warrior barber)

डोंगरी येथील संतोष बोधारे हे व्यवसायाने केस कर्तनकार आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व सलून बंद आहेत. संतोष बोधारे यांचं मुंबईतील डोंगरी इथे सलून आहे. सर्वच बंद असल्याने त्यांचाही सलून व्यवसाय बंद आहे. पण सर्व बंद आहे म्हणून आपण कसं गप्प बसायचं, ही बाब त्यांना सतत मनातून सतावत होती.

कोरोनाविरोधी लढ्यात डॉक्टर, पोलीस प्रत्यक्षात काम करत आहेत. मग त्यांना आपण मदत करायला हवी असा विचार बोधारे यांच्या मनात आला. आपल्याकडे केस कापायची कला आहे. या कलेचा वापर करुन या लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस यांची सेवा आपण करायची असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर, डोंगरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे केस कापायला सुरुवात केली. त्यांची ही सेवा सर्वांना आवडली. महत्वाचं म्हणजे संतोष बोधारे हे ही सेवा कोणताही मोबदला न घेता करत आहेत.

(Covid warrior barber)

संबंधित बातम्या 

Salon Reopen | ….तरच राज्यात सलून सुरु करण्याची परवानगी : छगन भुजबळ   

सलून सुरु करुन नाभिक समाजाला न्याय द्या : फडणवीस