कॅन्सरवर मात करताच मैदानात उतरले, चौकार, षटकार लगावत लुटला क्रिकेटचा आनंद

| Updated on: May 31, 2022 | 9:56 PM

“लहान बालकांमध्ये होणारा कॅन्सर हा वेळेवर केलेल्या योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो” हा संदेश संपूर्ण समाजामध्ये रुजविणे हा उगम या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कॅन्सरवर मात करताच मैदानात उतरले, चौकार, षटकार लगावत लुटला क्रिकेटचा आनंद
Follow us on

मुंबईः इंडियन कॅन्‍सर सोसायटी (आयसीएस) (Indian Cancer Society) ही कर्करोगावर काम करणारी भारतातील पहिली अग्रगणी स्वयंसेवी आणि राष्ट्रीय संस्था (National Society) आहे. ही संस्था मागील सत्तर वर्षांपासून लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता (Awerness) निर्माण करणे, कर्करोगाचे लवकर निदान करणे, वेळेवर उपचार करणे यासारख्या इतर अनेक विषयांवर काम करीत आहे. तसेच कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रमसुद्धा राबवित आली आहे.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या अंतर्गत येणार्‍या “आफ्टर कम्‍प्‍लीशन ऑफ थेरपी (एसीटी)” क्लिनिकमधून ज्या कॅन्सरग्रस्त लहान बालकांनी उपचार पूर्ण केले आहे त्यांनी इतर कॅन्सरग्रस्त लहान बालकांना प्रोत्साहित व सक्षम करण्यासाठी ‘उगम’ या सहाय्यक समूहाची स्‍थापना केली आहे.

कॅन्सर योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो

“लहान बालकांमध्ये होणारा कॅन्सर हा वेळेवर केलेल्या योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो” हा संदेश संपूर्ण समाजामध्ये रुजविणे हा उगम या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

‘उगम क्रिकेट मॅच’

उगम याच उपक्रमा अंतर्गत इंडियन कॅन्‍सर सोसायटी या संस्‍थेने 29 मे रोजी, कर्करोगावर मात केलेल्या तरुणाईसाठी ‘उगम क्रिकेट मॅच’चे आयोजन माहिम ज्‍युवेनाइल स्‍पोर्टस् क्‍लब येथे केले होते.

कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स

कोविड-19 महामारीच्‍या प्रादुर्भावानंतर सर्वकाही सुरळीत होत असताना व प्रथमच ग्राऊंडवर उतरलेल्या 50 हून अधिक कॅन्सर वर मात केलेल्या विजेत्‍यांचा (कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स) या सामन्‍यामध्‍ये उत्‍साहपूर्ण सहभाग दिसून आला.

कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स डे

दरवर्षी जूनमधील पहिल्‍या रविवारी ‘कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स डे’ संपूर्ण जगभर विविध संस्थांमार्फत साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून, कॅन्सरवर मात केलेल्या आणि आपापल्या जीवनामध्ये स्थिरवत असलेल्या 15 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जनरेशन झेड व मिलेनियल वॉरियर्सदरम्‍यान उत्‍साहपूर्ण क्रिकेट सामना खेळवण्‍यात आला.

सर्वोत्तम कामासाठी आशेचा किरण

बालपणापासूनच्‍या कर्करोगाच्‍या सर्व्‍हायवर्सना सक्षम करण्‍याच्‍या मनसुब्‍यासह आणि जीवनाचा आनंद देण्‍यासाठी सुप्रसिद्ध क्रिकेटर प्रवीण तांबे यांनी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थिती दाखवली आणि या क्रिकेट सामन्‍याची शोभा वाढवली. त्‍यांनी सर्व्‍हायवर्सना मार्गदर्शन केले, जे भारतभरातील कर्करोगाविरूद्ध लढण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सर्वोत्तम कामासाठी आशेचा किरण म्‍हणून उगमकडे पाहतात.

उगमची स्‍थापना

”बालपणापासून असलेल्‍या कर्करोगाच्‍या उपचाराबाबत जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या एकमेव मनसुब्‍यासह उगमची स्‍थापना करण्‍यात आली. यासंदर्भात आम्‍ही दरवर्षाला अनेक उपक्रमांचे आयोजन करतो, जे सर्व्‍हायवर्सना सक्षम करण्‍यामध्‍ये, जनतेला जागरूक करण्‍यामध्‍ये मदत करतात आणि कर्करोगाने पीडित मुलांसाठी मानसिक आधार ठरतात. कॅन्‍सर विजेत्यांचा क्रिकेट सामना हा बालपणापासून असलेल्‍या कर्करोगामधून बरे झालेल्‍या लाखो सर्व्‍हायवर्सना त्‍यांचे जीवन पुढे घेऊन जाण्‍यास मदत करण्‍यासाठीच्या अशा उपक्रमांपैकी एक होता. उगम आता मुंबईतील इतर हॉस्पिटल्‍समधील सर्व्‍हायवर्सना समाविष्‍ट करण्‍यासाठी आपली व्‍याप्‍ती वाढवत आहे. उगम लवकरच इतर शहरांमध्‍ये देखील आपली उपस्थिती वाढवणार आहे,” असे इंडियन कॅन्‍सर सोसायटीचा चाइल्‍डहूड कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स सपोर्ट ग्रुप “उगमच्‍या” कन्‍वेनर डॉ. पूर्णा ए. कुरकुरे म्‍हणाल्‍या.