Eknath Shinde: शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले, संकटात आहेत त्यांना…

Eknath Shinde Drought Farmer Relief Fund: आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 14 वा स्मृतीदिन आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर(शक्तीस्थळ) आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येत विनम्र अभिवादन केले.

Eknath Shinde: शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले, संकटात आहेत त्यांना...
शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
| Updated on: Nov 17, 2026 | 12:05 PM

Eknath Shinde Announcement: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या स्मृतीदिनानिमित्त शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा केली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर(शक्तीस्थळ) आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येत विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ, शेतकरी आणि उपाय योजनांबाबत घोषणा केली. त्यांनी संकट मोठे आहे असे सांगत शिवसैनिक आणि सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांना लवकरच मदतीचे आश्वासन

Loading...

आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाळासाहेबांचे कार्यकर्ते, शिवसैनिक या ठिकाणी अतिशय श्रद्धापूर्वक अभिवादन करतात. मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. बाळासाहेबांचे विचार, हिंदूत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. शिवसैनिक शेतकऱ्यांच्या मदतीला बांधावर जात आहेत. त्यांच्या संवेदना, दु:ख जाणून घेत आहेत. त्यांच्या भावना समजून घेत आहेत. त्यांना आवश्यक ती मदत करत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारही या शेतकऱ्यांच्या मागे मजबुतीने उभं आहे. परंतु सर्वांनी पुढे येणं गरजेचे आहे. जिथे कमी पडेल तिथे शिवसेना उभी आहे. आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संकट मोठं आहे. म्हणून जिथे संकट तिथे शिवसेना, ही बाळासाहेबांची, आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करत आहेत. याचा मलाही अभिमान आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मी इतकेच सांगतो की, सर्व कार्यकर्ते, सर्व मंत्री, खासदार, आमदारांनी ज्या ज्या ठिकाणी शेतकरी संकटात आहे, दुष्काळात आहे. त्या त्या ठिकाणी मदती करावी, असं मी आवाहन करत आहे, असे ते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राजकारण नको, पाठीशी उभे राहा

शेतकऱ्यांची दिवाळी काही होऊ देणार नाही असं आम्ही म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही तो शब्द पाळला. सरकारने पाच हजार रुपयांची तातडीची मदत शेतकऱ्यांना केली. शिवसेनेने सुद्धा दिवाळीचा शिधा दिला. यापुढे देखील जे जे आवश्यक आहे, ते ते शिवसेना करेल. जो संकटात आहे, त्याला मदत करण्याची बाळासाहेबांची भूमिका शिवसैनिक पार पाडत आहे. पाच हजारांची मदत ही तात्काळ करण्यात आली आहे. ही अग्रिम मदत आहे. दुष्काळ जाहीर केला. दुष्काळात ज्या बारा सवलती आहे, जी मदत आहे, ती तर मिळणारच आहे. अग्रिम मदत आहे. विरोधक जो काही बाऊ करतायेत, जे राजकारण करत आहेत, त्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us