मुख्यमंत्र्यांचा एक क्रांतिकारी निर्णय, किती कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ? किती कोटींची तरतूद? जाणून घ्या डिटेल्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ५००० रुपये तात्काळ मदतीची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, यामुळे एक ते सव्वा कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील इतिहासात प्रथमच एवढी मोठी अग्रीम मदत दिली जात आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरेल.

मुख्यमंत्र्यांचा एक क्रांतिकारी निर्णय, किती कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ? किती कोटींची तरतूद? जाणून घ्या डिटेल्स
Maharashtra drought
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 3:33 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या एका निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना 5000 रुपये अग्रीम मदत देण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. या सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जाणार आहे.ही अग्रीम मदत सुमारे 6000 कोटी रुपयांची असणार आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने एवढी मोठी अग्रीम मदत दिली नव्हती. यापूर्वीच्या सरकारांनी अंतिम मदतही 1000 रुपये होती. आता किमान मदतच 5000 रुपये देण्यात येत आहे.

Loading...

मदत कुणाला?

दिवाळी आधी पंचनामे झालेल्या सगळ्याच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून 100 टक्के पंचनामे पूर्ण करत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट दिली जाणार असल्याची माहिती आहे. कालपर्यंत 83 टक्के पंचनामे पूर्ण झाले होते. पंचनामे आणि नुकसान झालेले शेतकरी हे निकष असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

त्या अधिकाऱ्यांना निलंबित करू

यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. आचारसंहिता असल्याने आयोग परवानगी देत नाही, त्यामुळे अधिकारी बैठकीला येत नाही, अशी काही मंत्र्यांची तक्रार आहे. दुष्काळाच्या बैठकीला कुणी अधिकारी आचारसंहितेचे कारण सांगून येत नसतील, तर त्यांची नावे मला सांगा, त्या सर्वांना निलंबित करून टाकीन, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दुष्काळाच्या उपाययोजनांना आचारसंहिता नसते, मंत्र्यांनी आपले अधिकार वापरावेत. दुष्काळी बैठक/उपाय करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नसते, त्यामुळे परवानगी घेण्याच्याही भानगडीत पडू नका, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us