AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र दुष्काळात… भाजप नेत्यावर नोटांची उधळण; जालन्यातच घडला धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना, जालन्यात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर भजन कार्यक्रमात नोटांची उधळण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. शेतकरी पिके उद्ध्वस्त झाल्याने दुःखात असताना, ही घटना धक्कादायक आहे. गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि भक्तीत माणूस मंत्रमुग्ध होतो, असे स्पष्टीकरण दिले.

महाराष्ट्र दुष्काळात... भाजप नेत्यावर नोटांची उधळण; जालन्यातच घडला धक्कादायक प्रकार
Kailas GorantyalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 2:48 PM
Share

रामनाथ ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने राज्यातील 358 तालुक्यांपैकी 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे डोळ्यासमोरच पावसाअभावी उभी पीकं जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना पिकांवर रोटावेटर फिरवावा लागला आहे. डोळ्यात अश्रू आणि छातीत वेदना घेऊन शेतकरी दिवस ढकलत आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यावर नोटांची उधळण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या जालन्यात मोठा दुष्काळ आहे, त्याच भागात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जालन्यात भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली आहे. काल रात्री जालना शहरात मंमादेवी मंदिर परिसरात पार पडलेल्या भजन कार्यक्रमांमध्ये नोटांची उधळण करण्यात आली. भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रात्री शहरातील मंमादेवीच्या भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ठेका धरला होता. गोरंट्याल यांनी मै हुँ डॉन… या गाण्यावर ठेका धरला होता. गोरंट्याल यांच्यावर पैशाची उधळण झाल्याची आणि त्यांनी ठेका धरल्याची बातमी येताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे गोरंट्याल यांनी सारवासारव केली आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव…

भजन कार्यक्रमाच्या अगोदर मी देवाकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली. भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो. तेव्हा कोण काय करतो माहीत होत नाही, अशी सारवासारव कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. आरतीच्या निमित्ताने मी कार्यक्रमाला गेलो असता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या म्हणण्या प्रमाणे करावं लागतं. प्रामाणिकपणाने सांगतो, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आणि आम्ही कटिबद्ध आहोत. माझी कार्यकर्त्यांना सांभाळण्याची एक वेगळी पद्धत आहे. आपण पुढाऱ्यासारखं वागलं तर ते आपल्या सोबत येत नाहीत, म्हणून त्यांच्यासारखं वागावं लागतं, असंही त्यांनी म्हटलंय.

सरकारची मदत जाहीर

दरम्यान, राज्य सरकारने आज अजून 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच दिवाळीपूर्वी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. बाकीचे पैसे नंतर देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं. तसेच चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप