कोरोनाला थोपवण्यासाठी फडणवीसांचा नवा फॉर्म्यूला , ‘या’ त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा राज्य सरकारला सल्ला

| Updated on: Mar 27, 2021 | 3:54 PM

मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. (devendra fadnavis lockdown corona patient)

कोरोनाला थोपवण्यासाठी फडणवीसांचा नवा फॉर्म्यूला , या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा राज्य सरकारला सल्ला
कोरोना सांकेतिक फोटो आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ट्विट करत ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय. तसेच, चाचण्या वाढवणे हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे.  हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,” असा टोलाही त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis opposes lockdown advised Testing Tracing and Treatment of corona patient)

आता तरी हे सूत्र कायम ठेवा

“राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेची वाट पहावी लागली. येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. आता तरी हे सूत्र कायम ठेवा,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

राज्यात शुक्रवारी तब्बल 36900 नवे रुग्ण

राज्यात शुक्रवारी दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चारर्ज देण्यात आला होता. शुक्रवारची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून नुक्त झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला असून कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे. यामध्ये आज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्यामुळे हा आकडा आज ( शनिवारी) पुन्हा वाढणार आहे.

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने म्हटले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुक्रवारी (26 मार्च) दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Maharashtra Night Curfew मोठी बातमी : राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी