अमरावती, नांदेडमधील दंगलीवर विधानसभेत खडाजंगी; फडणवीस म्हणाले, हा ‘प्रयोग’ होता

| Updated on: Dec 27, 2021 | 6:19 PM

मरावतीत दंगल झाली. या दंगलीतील तोडफोडीचं पहिल्याच दिवशी समर्थन केलं गेलं. दुसऱ्या दिवशीही तोडफोड झाली. मी कोणत्याच तोडफोडीचं समर्थन करणार नाही.

अमरावती, नांदेडमधील दंगलीवर विधानसभेत खडाजंगी; फडणवीस म्हणाले, हा प्रयोग होता
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या दंगली हा दंगली घडवण्यासाठीचा प्रयोग होता, असा गंभीर आरोप करतानाच 40-40 हजारांचा जमाव कोणतंही नियोजन नसताना रस्त्यावर येतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत हा सवाल केला. अमरावती, नांदेड, मालेगाव सहrत अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग केला गेला, असं सांगतानाच अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले पोलसी आयुक्त रजेवर होते. त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याने मोर्चाला परवानगी दिली. कोविडमध्ये आमच्या मोर्चाला परवानगी देत नाही. पण या मोर्चाला दिली, असं फडणवीस म्हणाले.

कोणत्याच तोडफोडीचं समर्थन नाही

अमरावतीत दंगल झाली. या दंगलीतील तोडफोडीचं पहिल्याच दिवशी समर्थन केलं गेलं. दुसऱ्या दिवशीही तोडफोड झाली. मी कोणत्याच तोडफोडीचं समर्थन करणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या रिअॅक्नशन नंतर पहिल्या दिवशी काही घडलंच नाही असं चित्रं निर्माण केलं गेलं. पहिल्या दिवशीची घटना गेली. दुसऱ्या दिवशीची घटनाच महत्त्वाची समजून कारवाई सुरू झाली, असं त्यांनी सांगितलं.

हिंदूंची दुकानं फोडली

पहिल्या दिवशीच्या दंगलीत जाणीवपूर्वक हिंदूंची दुकानं फोडली गेली. हिंदूंना त्रास दिला गेला. ज्या रझा अकादमीने मुंबईतही दंगल घडवली त्या रझा अकादमीवर कारवाई का नाही केली? असा सवाल त्यांनी केला.

राज्यात बदल्यांचं रॅकेट

यावेळी त्यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटकडेही सरकारचं लक्ष वेधलं. राज्यात बदल्यांचं रॅकेट सुरू आहे. आता अधिकारीच किती पैसे देऊन आलोय हे सांगत आहेत. हे काही आम्ही सांगत नाही. हे रॅकेट बाहेर आल्याने सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पोलीस दलाकडे पाहिलं जायचं. आता तसं समजलं जाणार नाही. मी मुख्यमंत्री असताना बदल्यांचं रॅकेट लक्षात आलं. तेव्हा एसआयटीला सांगून हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. आता एसआयटीने रॅकेटची माहिती दिल्यानंतर माहिती देणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली हे काय चाललं आहे?, असा सवाल त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना दोन भाई गैरहजर; रामदास कदम यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?

ठरलं! पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच; तारीखही ठरली