AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ओ खैरे, व्हा आता बहिरे… संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

मी तर संभाजीनगरच बोलतो, औरंगाबादच्या नामांतराची गरज काय? असा सावल यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्याला आता आज मुंबईतल्या भाजपच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Devendra Fadnavis : ओ खैरे, व्हा आता बहिरे... संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
ओ खैरे, व्हा आता बहिरे... संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 8:43 PM
Share

मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची मुंबईतल्या बीकेसीत हायव्होल्टेज सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरून बोलताना संभाजीनगर (Sambhajinagar) उल्लेख करत भाजपवर टीका केली. मी तर संभाजीनगरच बोलतो, औरंगाबादच्या नामांतराची गरज काय? असा सावल यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्याला आता आज मुंबईतल्या भाजपच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पाच वर्षे तुम्ही आमच्यासोबत संसार केला. आमची संपत्ती घेऊन पळून गेलात आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. ऑफिशियल काडीमोड तरी घ्यायचा आणि म्हणे एकतर्फी प्रेम.कालचं भाषण सोनियाजींना समर्पित होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसची भूमिका म्हणजेत कालचं भाषण होतं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

बोलायला काही नसलं की म्हणतात…

तसेच माझा प्रश्न आहे की उद्धवजींना हे माहिती तरी आहे का डॉ. हेडगेवार यांचं नाव देशातील स्वातंत्र्यसेनानीमध्ये आहे. ज्यावेळी आणीबाणी लादली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही कुणाच्या बाजून होता. यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… कुणाच्या बापाची ताकद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची? मुंबई वेगळी करायची आहे आम्हाला पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून वेगळी करायची आहे. रस्ते, नाली, भूयार काहीच सोडलं नाही. असा आरोप फडणवीसांनी केला.

खैरे व्हा आता बहिरे

तर मुख्यमंत्र्यांचं हे भाषण शिवसैनिकासाठी होतं तसं ते सोनियांजींसाठी होती. काल म्हणाले संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना… ओ खैरे व्हा आता बहिरे…असे म्हणत फडणवीसांनी खिल्ली उडवली, तसेच औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण कालच उद्धवजी म्हणाले मॅडम आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही संभाजीनगर करत नाही आम्ही औरंगाबादच ठेवतो, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत.

मुंबईचा बाप एकच

उद्धवसाहेब… तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही. मुंबईत महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा बाप नाही आणि हे स्वत:ला मुंबईचा बाप म्हणून घेत आहेत. अनौरस पुत्र ऐकला होता पण अनौरस बाप कधी ऐकला नाही. शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचारी आत्महत्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पाणी वीज मिळत नाही, सामान्य माणसाकडे कोण पाहणार आहे? तुमचं मनोरंजन चाललं आहे पण सामान्य माणसाची आज काय अवस्था आहे? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.