सरकारने राज्यपालांना पाठवलेलं भाषण चौकातल्या भाषणासारखं; फडणवीसांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 02, 2021 | 1:26 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. (devendra fadnavis slams maharashtra government on various issues)

सरकारने राज्यपालांना पाठवलेलं भाषण चौकातल्या भाषणासारखं; फडणवीसांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यपालांच्या भाषणात पुढच्या एक वर्षात सरकार काय करणार? सरकारच्या कामाची काय दिशा असेल याची माहिती असायला हवी होती. पण चौकात भाषण करतो तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. (devendra fadnavis slams maharashtra government on various issues)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आपण चौकात जसं भाषण करतो तशाच पद्धतीनं राज्यपालांचं भाषण लिहिलेलं होतं. सरकारने हे भाषण राज्यपालांना तसंच पाठवून दिलं. या भाषणात शब्दांची रत्नच होते. केवळ यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यपालांच्या भाषणात कोणताही आलेख दिला नाही. केवळ वाक्यच दिली आहेत. पोल उभारणीचे कार्यक्रम घेतले. म्हणजे नेमकं काय केलं? काहीच नाही. प्रयोगशाळा उभारल्या? किती उभारल्या? कुठे उभारल्या? काहीच नाही. जम्बो रुग्णालये उभारले. कुठे उभारले? कधी उभारले? किती कंत्राटदारांना त्याचा फायदा झाला? औषधांची सामुग्री दिली, किती दिली? महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ दिला, तो कुणाला दिला? किती लोकांना त्याचा लाभ झाला? आदी कशाचाही लेखाजोखा या भाषणात नव्हता. कोरोना काळात किती लोकं वाचली आणि किती लोकांना औषधोपचार करण्यात आला या पलिकडे यात काहीच नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

विमान नाकारणं चुकीचं

यावेळी त्यांनी राज्यपालांना विमान नाकारण्यात आल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. राज्यपाल-सरकार संघर्ष नवा नाही. पण म्हणून राज्यपालांना विमान नाकारणं योग्य नाही. राज्यपालांचा अपमान करणं चुकीचं होतं, असं ते म्हणाले.

कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार

जे मनात आलं ते सध्या राज्यात सुरू आहे. कोणताही मंत्री उठतो, कुठेही जातो आणि लॉकडाऊन लावून येतो. काय चाललं हे… लॉकाडाऊनचा पोरखेळ सुरू आहे का? असा सवाल करतानाच दहा बालकांना सॅनिटायझर पाजलं गेलं. दोन नर्सवर कारवाई करण्यात आली. मृताच्या टाळूवरचं लोणीही खाण्याचा प्रकार झाला, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील कोविड सेंटरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. कोविड सेंटर्स ही भ्रष्टाचाराची कुरणं झाली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

फक्त फेसबुक लाईव्ह चाललंय

सध्या सरकारमध्ये काय चाललंय? असं विचारलं तर सध्या राज्यात फेसबुक लाईव्ह सुरू आहे. मागच्या वेळचं मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह चांगलं झालं. ते आम्हाला आवडलं. कारण त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हालाही तेच सांगायचं आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तो ऐका, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

तुमची जबाबदारी काहीच नाही?

मुख्यमंत्र्यांनी आधी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा केली. आता मीच जबाबदार अशी घोषणा केली आहे. म्हणजे सरकार हात झटकून मोकळे, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या. म्हणजे अर्धी जबाबदारी जनतेची आणि अर्धी मोदींची. तुमची जबाबदारी काहीच नाही? असा सवालही त्यांनी केला. (devendra fadnavis slams maharashtra government on various issues)

 

संबंधित बातम्या:

“आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही; अजित पवार यांची घोषणा

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(devendra fadnavis slams maharashtra government on various issues)