AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावी सोशल मिशनच्या ‘रिसोर्स सेंटर’चे लोकार्पण, वर्षभरात कौशल्य विकासाच्या 10,000 संधी, तर 3000 रोजगार

धारावीकरांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी संसाधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असून डीएसएमच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त धारावीकरांना सामावून घेतले जाणार आहे.

धारावी सोशल मिशनच्या 'रिसोर्स सेंटर'चे लोकार्पण, वर्षभरात कौशल्य विकासाच्या 10,000 संधी, तर 3000 रोजगार
dharavi resource centre
| Updated on: Jan 08, 2025 | 6:34 PM
Share

धारावी येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी धारावीतील झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.धारावीकरांना मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी धारावी सोशल मिशनच्या ( डीएसएम ) पहिल्या संसाधन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे.या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास या विविध पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून धारावीकराचे दैनंदिन जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

धारावीला ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखले जाते. धारावीतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मेहनतीने आणि जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी झटणाऱ्या युवकांची अनेक उदाहरणे आहेत. धारावी सोशल मिशनच्या ( डीएसएम ) संसाधन केंद्राच्या माध्यमातून अशा तरुणांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून धारावीकरांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करण्याचा धारावी सोशल मिशनच्या ( डीएसएम) मानस आहे.

धारावीतील रहिवाशांसोबत जवळून काम करण्याची संधी देणारे संसाधन केंद्र अखेर सुरू होत आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. वास्तविक, गेल्या वर्षापासूनच डीएसएमच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांमधून आम्हाला विविध वयोगटातील धारावीकरांशी संपर्क साधता आला आहे. येथील रहिवाशांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे आणि त्यांना उत्तम दर्जाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे डीएसएमच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

धारावी सोशल मिशनची स्थापना जून 2024 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन डीएसएमच्या वतीने केले गेले आहे.धारावीकरांशी आपली नाळ घट्ट करत त्यांच्या उज्वल आणि आत्मसन्मानपूर्ण भविष्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे डीआरपीपीएल) यांनी केली होती.हे संशोधन केंद्र या कटिबद्धतेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुरू झालेली वाटचाल आहे.

उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न

‘वास्तविक डीएसएमने विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करून याआधीच धारावीकरांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. धारावीतील लघुउद्योग आणि बचत गटांच्या समोरील आव्हाने जाणून घेण्यासाठी डीएसएमच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमधून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि थेट बाजारपेठेशी जोडून लघु उद्योजक आणि स्वयं सहाय्यता गटांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘युवा संवाद’ कार्यक्रमात 180 हून अधिक युवकांनी सहभाग घेऊन नवनव्या संधी शोधण्यासाठी धारावीतील आपल्या सहकाऱ्यांना प्रेरित केले. अशा कार्यक्रमांमधूनच धारावीकरांशी आमची नाळ जोडली गेली आणि त्यांच्यासाठी आणखी उपक्रम राबविण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, असेही डीएसएमच्या प्रवक्त्याने सांगितले.

रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगार

सुमारे 12 लाख लोकांना आश्रय देणाऱ्या धारावीत कोणताही उपक्रम हा पुरेसा पडणार नाही. पण तरीही, उज्वल भविष्यासाठी सर्वांना समान संधी देण्याच्या हेतूने कुठूनतरी सुरुवात करणे आवश्यक आहे. डीएसएमची यशस्वी वाटचाल ही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. लोक विकास उपक्रमातून धारावीतील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना सुमारे 10 कोटी रुपयांच्या मोफत शासकीय आरोग्य सुविधांचा फायदा करून देण्यात आला आहे. रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगार मिळाले, तर सुमारे 200 रहिवाशांना विविध प्रकारच्या 177 शासकीय योजनांमधून थेट फायदा मिळाला. सुमारे 200 धारावीकरांना विविध प्रकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी करून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सुमारे 200 रहिवाशांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती धारावी सोशल मिशनच्या प्रवक्त्याने दिली.

‘धारावीकरांच्या आशा – आकांक्षा समजून घेऊन उज्वल भविष्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आमचे लक्ष्य असून, 2025 मध्ये सुमारे 10,000 कौशल्य विकासाच्या संधी, 3000 तरुणांना रोजगाराच्या संधी आणि आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दुप्पटीवर नेण्याचा आमचा मानस आहे, ‘ असेही डीएसएमच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.