क्षुल्लक कारणावरुन डोंबिवलीत तरुणाची हत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेली डोंबिवली सध्या गुन्ह्यांची नगरी बनत चालली आहे. डोंबिवलीमध्ये तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत सचिन पाटील नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिनच्या रिक्षा चालक मित्राचे महिन्याभरापूर्वी बाईक चालकाशी क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. […]

क्षुल्लक कारणावरुन डोंबिवलीत तरुणाची हत्या
Follow us on

मुंबई : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेली डोंबिवली सध्या गुन्ह्यांची नगरी बनत चालली आहे. डोंबिवलीमध्ये तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत सचिन पाटील नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सचिनच्या रिक्षा चालक मित्राचे महिन्याभरापूर्वी बाईक चालकाशी क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणात सचिनने मध्यस्थी केली होती. यातूनच सचिनची हत्या करण्यात आल्याचं त्याचे कुटुंबीय सांगतात. सचिनच्या नातेवाईंकांचा आरोप आहे की, या सर्व प्रकरणामागे वेद प्रकाश पांडे नावाची व्यक्ती आहे. जी सध्या बाहेर गावी आहे. वेद पांडे हा डोंबिवली मनसेचा उपशहराध्यक्ष आहे.

जुन्या डोंबिवली शिवमंदिर परिसरात राहणारा सचिन हा रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जात असताना सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने चॉपर व कोत्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सचिन जागीच ठार झाला. या घटनेनंतर सचिनच्या काही मित्रांनी हल्ला करणाऱ्या गटावर हल्ला चढवला. या हल्ल्यात सिद्धेश कुलकर्णी नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. सिद्धेश कुलकर्णीवर सचिनच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वेद पांडेचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.

मात्र दिवसेंदिवस डोंबिवलीत गुन्ह्यांच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डोंबिवली आता सांस्कृतिक नगरी नाही तर गुन्ह्यांची नगरी बनत चालली आहे.