U19 IND vs PAK Final : टीम इंडियाने टॉस जिंकला, पाकिस्तान विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हमध्ये कोण?
India vs Pakistan U19 Asia Cup Final: सिनिअर मेन्स टीम इंडियानंतर अंडर 19 टीम इंडिया आशिया कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात पाकिस्तानचं आव्हान आहे.

अंडर 19 आशिया कप 2025 फायनलमध्ये (U19 Asia Cup 2025 Final) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे दुबईतील आयसीसी अॅकडेमी ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार आयुष म्हात्रे याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारतीय गोलंदाज पाकिस्तानला किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारत-पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने
टीम इंडिया-पाकिस्तान या दोन्ही संघांची अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांसह भिडले होते. भारताने 14 डिसेंबरला पाकिस्तानवर 90 धावांनी मात केली होती. त्यामुळे आता टीम इंडिया अंतिम फेरीत पाकिस्तानला लोळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची इथवरची कामगिरी
टीम इंडिया साखळी फेरीत अजिंक्य राहिली. टीम इंडियाने साखळी फेरीत पाकिस्तान व्यतिरिक्त मलेशिया आणि यूएईवर मात केली होती. तसेच भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली. भारताने श्रीलंकेवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता.
अंतिम फेरीत कोण जिंकणार?
तसेच पाकिस्तानने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले. पाकिस्तानने मलेशिया आणि यूएईवर मात करत उपांत्य फेरीत धडक दिली होती. त्यानंतर पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशवर 19 डिसेंबरला 8 विकेट्सने मात केली. आता अंतिम सामन्यात या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांपैकी कोण मैदान मारणार? यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨
India U19 have won the toss and elected to field first in the #Final.
Updates ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3#MensU19AsiaCup2025 pic.twitter.com/Jgjo1c1TvB
— BCCI (@BCCI) December 21, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, हेनिल पटेल, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन आणि किशन कुमार सिंग.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (कॅप्टन), हमजा जहूर (विकेटकीपर), हुजैफा अहसान, निकाब शफीक, मोहम्मद शायन, अली रझा, अब्दुल सुभान आणि मोहम्मद सय्यम.
