“छत्रपतींबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बरबाद होतील” भाजपच्याच नेत्याचा भाजपला घरचा आहेर

| Updated on: Dec 05, 2022 | 8:49 PM

तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापराल तर विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत आहे.

छत्रपतींबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बरबाद होतील भाजपच्याच नेत्याचा भाजपला घरचा आहेर
Follow us on

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड त्यानंतर प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकाराविरोधात विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्याच बरोबर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला होता.

तर त्यानंतर आज पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणी वादग्रस्त बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बरबाद होतील असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील जनतेचे एकमेव असे राजे होते. त्यामुळे त्यांच्या आदर्श कारभारावरच त्यांचा जगभर गौरव केला जातो.

त्यामुळे शिवाजी महाराज हे एकमेव रयतेचे राजे होते. त्यांच्यासारखा आता रयतेचे राजे होणे नाही असे गौरवोद्गगारही त्यांच्याबद्दल काढण्याते आले.
ज्या प्रमाणे आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे.

त्याचप्रमाणे त्यांचे नाव जगामध्ये आदराने घेतले जाते. त्यामुळे राजकीय पक्षाच्या लोकांना बबनराव लोणीकर यांनी राज्यकर्त्यांना विनंती आणि आव्हान करत शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलू नका असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापराल तर विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत आहे. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे असा म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

या देशात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनो सावधान राहा. महाराज आमचे आदर्श राजे आहेत आणि त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोलू नये अशा प्रकारची माझी नम्र प्रार्थना आणि विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.