मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’चे सचिव आर. ए. राजीव यांची चौकशी

| Updated on: Feb 16, 2021 | 9:56 AM

'ईडी'ने मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सचिव आर. ए. राजीव यांना समन्स बजावल्यानंतर आज त्यांची चौकशी होणार आहे. ED inquiry MMRDA Secretory R.A. Rajiv

मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ईडीकडून एमएमआरडीचे सचिव आर. ए. राजीव यांची चौकशी
आर.ए. राजीव
Follow us on

मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ‘ईडी’ने मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सचिव आर. ए. राजीव यांना समन्स बजावल्यानंतर आज त्यांची चौकशी होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचं संभाषण लागल्याची माहिती आहे. (ED inquiry MMRDA Secretory R.A. Rajiv Over Tops Security Case)

टॉप्स सेक्युरिटी घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाचं मोबाईल संभाषण लागलं आहे. अमित चंडोले आणि टॉप्स सेक्युरिटी चे मॅनेजिंग डायरेक्ट एम शशिधरन यांच्यात झालेलं हे संभाषण आहे. हे दोघेही या प्रकरणात अटक आरोपी आहेत.

या संभाषणात एमएमआरडीए च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच नाव घेण्यात आल आहे. जॉइंट कमिशनर बी जी पवार यांच नाव आलं आहे. या अधिकाऱ्याला लाच न दिल्यास तो आपल्याला अडचण निर्माण करु शकतो असे संभाषणात म्हटलं आहे. ईडीने बिजी पवार यांना ही समन्स बजावलं आहे. आज याच अनुषंगाने एमएमआरडीएचे कमिशनर आर ए राजीव यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

काय आहे नेमका घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती.

(ED inquiry MMRDA Secretory R.A. Rajiv Over Tops Security Case)

हे ही वाचा :

मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना समन्स