मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना समन्स

आता आर.ए. राजीव यांना 'ईडी'समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. | ED MMRDA

मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात 'ईडी'कडून 'एमएमआरडी'च्या आयुक्तांना समन्स
आर.ए. राजीव
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 11:50 AM

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजलेल्या टॉप्स सिक्युरिटी (Tops Security) प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने (ED) आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘ईडी’कडून मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सचिव आर.ए. राजीव यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता आर.ए. राजीव यांना ‘ईडी’समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (ED issues summons to MMRDA chief R.A. Rajiv)

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात ‘ईडी’कडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, प्रताप सरनाईक यांच्या डिसेंबर महिन्यातील चौकशीनंतर हे प्रकरण फारसे पुढे सरकले नव्हते. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी ईडीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपली चौकशी केल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता ईडीने थेट ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांनाच समन्स पाठवल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे नेमका घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती.

संबंधित बातम्या:

जे सत्य आहे ते मी सांगितलंय, माझा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही : प्रताप सरनाईक

केंद्र-राज्य संघर्षात मी तानाजी मालुसरे झालो : प्रताप सरनाईक

Special Report | प्रताप सरनाईकांच्या चौकशीतून ईडीच्या हाती काय लागणार?

(ED issues summons to MMRDA chief R.A. Rajiv)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.