आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धा लागलीय, एकनाथ शिंदे यांचा इशारा कुणीकडं

| Updated on: Dec 02, 2022 | 8:34 PM

बाबासाहेबांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये. कुठलीही अडचण येऊ नये.

आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धा लागलीय, एकनाथ शिंदे यांचा इशारा कुणीकडं
एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटकच्या सचिवांनी सीमाप्रश्नाबाबत दिलेल्या पत्राची मला माहिती नाही. कर्नाटक सीमाप्रश्नावर राजकरण करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढा. सरकारवर आरोप -प्रत्यारोप करणे सुरू आहे. महाराष्ट्रात राजकारण्यांची स्पर्धा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचा नाव न घेता समाचार घेतला. काम की बात करो, असं ते म्हणाले.

अडीच वर्ष कुणाचे तोंड उघडले नव्हेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आरोप प्रत्यरोप करण्याची स्पर्धा सुरू आहे. आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. लोकांची काम करायची असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय.

जत तालुक्यासंदर्भात बैठक झाली आहे. आरोग्य, रस्ते याबाबतच्या प्रश्नांवर चर्चा झाली. पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू झालं आहे. म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळेल. कायमस्वरुपी तोडगा मिळेल. जत तालुक्यातील लोकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल,  असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन आहे. त्यानिमित्त चैत्यभूमीवर लाखो बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात. त्यासाठी महापालिका नियोजन करते.

याची पाहणी करायला याठिकाणी आलोय. बाबासाहेबांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये. कुठलीही अडचण येऊ नये. त्याचं नियोजन योग्य प्रकारचं असलं पाहिजे. यासाठी तयारी सुरू झाली आहे. अतिशय उत्तम व्यवस्था होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.