तीन वर्षांनी पुन्हा येत आहे ‘अल नीनो’, उष्णतेने होणार हाल

| Updated on: Jan 19, 2023 | 11:21 AM

अमेरिकन जियोसायन्स इन्सिट्यूटने दिलेल्या माहितीनूसार 'अल नीनो' शब्दाचा संदर्भ प्रशांत महासागराच्या समुद्रपातळीच्या तापमानात वेळोवळी होणाऱ्या बदलाशी आहे. ज्याचा प्रभाव जगातील तापमानावर होत असतो.

तीन वर्षांनी पुन्हा येत आहे अल नीनो, उष्णतेने होणार हाल
SUMMER
Image Credit source: SUMMER
Follow us on

मुंबई : यंदाचे  2023 साल तापमान वाढीचे असणार आहे. त्यामुळे जगभरातील तापमानात (temperature) वाढ होणार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा जागतिक तापमानाला प्रभावित करणारी मौसमी परिस्थिती अल नीनो ( EL Nino) तीन वर्षांनंतर पुन्हा तयार होणार असल्याचे नासाने (NASA) म्हटले आहे. साल 2022 मध्ये जगाचे तापमान सरासरी 1.1 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदले गेले होते. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहीतीनूसार साल 1901 नंतर साल 2022 पाचवे सर्वाधिक उष्ण वर्षे होते.

अल नीनो काय आहे?

‘अल नीनो’ हा स्पॅनिश शब्द असून ज्याचा अर्थ ‘लिटील बॉय’ किंवा ‘क्राइस्ट चाइल्ड’ होतो. या घटनेला पहिल्यांदा दक्षिण अमेरिकेच्या मच्छिमारांनी 1600 दशकात प्रशांत महासागरात पाहीले होते. हा प्रभाव महासागरीय प्रवाह, वायुमंडळाचे तापमान आणि सजिव चक्राचे समतोल ढळल्यावर निर्माण होतो, त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान प्रचंड वाढत असते.

‘अमेरीकन जियोसायन्स इन्सिट्यूट’च्या मते ‘अल नीनो’ आणि ‘ला नीना’ शब्दाचा संदर्भ प्रशांत महासागराच्या तापमानात होणाऱ्या बदलाशी संबंधित आहे. ज्याचा जगभरातील वातावरणावर परीणाम होत असतो. अल नीनो मुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढते. तर ‘ला नीना’ मुळे ते थंड होते. दोन्हींचा प्रभाव नऊ ते बारा महिने राहतो. परंतू काही प्रसंगी अनेक वर्षे राहू शकतो.

‘अल नीनो’ मुळे महासागरांचे पाणी तापते. ज्याचा परीणाम मासेमारी करणारे तसेच शेतकरी बांधवांवर होत असतो. ज्या समुद्रकिनारी शहरात जास्त पाऊस पडतो. अल नीनो मुळे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि दक्षिणी आशियातील काही भागात दुष्काळ पडतो. तसेच प्रशांत महासागर क्षेत्रात चक्रीवादळ आणि टायफूनची शक्यताही वाढते.