Tukaram Mundhe: प्रत्येक ॲक्शन वेळेवर, मग धडाकेबाज तुकाराम मुंढे का वापरत नाहीत घड्याळ? उत्तर ऐकून थक्क व्हाल
Tukaram Mundhe Wrist Watch: राज्यातील धडाकेबाज सनदी अधिकारी, अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे घड्याळ का वापरत नाहीत? काय आहे त्यामागील कारण? त्यांनीच याविषयी दिले असे उत्तर...

FDA Commissioner Tukaram Mundhe Wrist Watch: धडाकेबाज अधिकारी, अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा डंका जागतिक पातळीवर वाजला आहे. त्यांच्या धडक कारवायांनी भेसळखोरांचे धाबे दणादले आहे. कामकाजातील झपाटा, अचूक टायमिंग साधत केलेली कारवाई यामुळे त्यांचा एक खाक्या आणि दरारा तयार झाला आहे. पण मुंढे सध्या एका वेगळ्याच कारणाने लक्ष वेधून घेत आहेत. एका मुलाखतीचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी महागड्या वस्तू, पेहराव आणि मनगटावरील घड्याळ का घालत नाही, यामागील कारण स्पष्ट केले आहे.
घड्याळ का घालत नाहीत?
या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना तुम्हाला महागडी घड्याळं, महागडे कपडे आणि आलिशान जीवनशैलीचे आकर्षण नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी व्यावहारिक आणि थेट उत्तर दिले. घड्याळ घेण्याची ऐपत नक्कीच आहे. पण वस्तू महागडी असण्यापेक्षा तिची खरच गरज आणि मूळ उद्देश काय, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. घड्याळाचा मुळ उद्देश हा वेळ पाहणे हा आहे. पण आता मोबाईलमध्येच घड्याळ दिसते. वेळ दिसते. मग वेगळे घड्याळ कशाला हवे? माझ्याकडे मोबाईल आहे, असे सांगत त्यांनी बडेजावपणा नको, साधेपणा हवा याकडे लक्ष वेधले.
महागड्या कपड्यांची नाही क्रेझ
तुकाराम मुंढे यांची तरुणाईमध्ये खास चर्चाच नाही तर क्रेझ आहे. प्रशासकीय अधिकारी असावा तर असा, असाच सर्वसामान्यांचा सूर आहे. तर आपल्या पेहरावाबाबतही मुंढे यांनी भूमिका मांडली आहे. कपडे महागडे असावेत असे काही नाही असे ते म्हणाले. ब्रँड आणि किंमतीपेक्षा कपड्यांची निवड योग्य असणे, शिलाई चांगली असणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
शिस्त आणि सुसूत्रतेवर ते भर देत असल्याची माहिती त्यांनी दिली. वस्तू ही महागडीच असावी असे नाही तर ती चांगली, नीटनेटकी आणि सुटेबल असावी असे त्यांनी सांगितले. नीट विंचरलेले केस, चष्मा, बूट असा योग पेहराव असावा याबाबत त्यांनी माहिती दिली.