AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अग्नितांडव! मिरा-भाईंदरमध्ये 5 इमारतींना लागली आग, मोठे नुकसान

Mumbai Fire : मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून, या आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईत अग्नितांडव! मिरा-भाईंदरमध्ये 5 इमारतींना लागली आग, मोठे नुकसान
Fire in MumbaiImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 24, 2026 | 10:50 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून, या आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केले. परिसरातील चार ते पाच इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की काही घरांनाही तिचा फटका बसला. घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून वातावरण अत्यंत धोकादायक बनले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गेल्या काही तासांपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने परिसर सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

मोठे आर्थिक नुकसान

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलिंडर स्फोटाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या इतरही इमारतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. या आगीत दोन ते तीन टेम्पोचे सुद्धा नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अंधेरीतही इमारतीला लागली आग

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग लागली आहे. मेघदूत बिल्डिंच्या बी विंगला ही आग लागली असल्याचे समोर आले आहे. ग्राउंड प्लस 22 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावरही आग लागली आहे. घटनेची माहिती समजताच मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस, रुग्णवाहिका आणि वॉर्ड स्टाफही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कल्याणमध्येही आगीची घटना

कल्याण पूर्वेतील मॉडेल कॉलेज परिसरात टपऱ्यांना भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. चिंचपाडा रोडवरील मॉडेल कॉलेज परिसरात ही घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची एकच धावपळ पहायला मिळाली, तसेच कॉलेज परिसरात गोंधळ पहायला मिळाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?