AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार वर्षं फ्रीजरमध्ये मृतदेह! मालाडच्या क्लिनिकमध्ये नेमकं काय घडलं? मुंबईत खळबळ

मालाडमधील एका क्लिनिकमध्ये चार वर्षांपासून फ्रीजरमध्ये ठेवलेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये कर्करोगाने निधन झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह, कुटुंबीयांनी भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना जिवंत करता येईल या आशेने जपून ठेवला होता. पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे.

चार वर्षं फ्रीजरमध्ये मृतदेह! मालाडच्या क्लिनिकमध्ये नेमकं काय घडलं? मुंबईत खळबळ
Malad ClinicImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 5:39 PM
Share

मालाड-कुरार पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कोकणी पाडा परिसरात असलेल्या एका डे केअर सेंटर-क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्लिनिकमधील एका रेफ्रिजरेटेड फ्रीजरमध्ये 2022मध्ये मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल चार वर्ष मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचं कळताच स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. कुरार पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कसून तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 2022 मध्ये या वृद्ध व्यक्तीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. या मृताच्या मुला-मुलीचे वडिलांशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. याच कारणामुळे मृतदेह डे केअर सेंटरच्या फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता, असं सांगितलं जात आहे. मात्र इतक्या दीर्घकाळ फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवण्यामागचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये कुटुंबाची आणि क्लिनिकची काय भूमिका होती? याचा पोलिस तपास करत असून तपासानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाही. उलट हा मृतदेह फ्रीजरमध्ये जतन करून ठेवला. मृत व्यक्तीचं वय 80 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबातील लोकांच्या सांगण्यावरूनच चार वर्षापासून हा मृतदेह जपून ठेवल्याचं डेकेअरचं म्हणणं आहे.

जिवंत होण्याची आशा…

पोलिसांनी या मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलांची कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब मानसिक धक्क्यात होतं. त्यांना आपल्या वडिलांना गमवायचे नव्हते. त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या एका क्रायोनिक्स सेंटरमध्ये नेऊन हा मृतदेह सुरक्षित ठेवायचा होता. भविष्यात टेक्नॉलॉजी डेव्हल्प झाल्यावर त्यांना जिवंत करता येईल, या आशेवर त्यांनी मृतदेहावर अंतिमसंस्कार केले नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विज्ञानाच्या जगात सेल्स, टिशूज आणि भ्रूणची क्रायोप्रिजर्वेशन ही एक प्रक्रिया आहे. मात्र, मानवी शरीराची क्रायोनिक्स टेक्निक अजूनपर्यंत एक्सपेरिमेंटल आहे.

असा झाला खुलासा

कुरार पोलिसांना सोमवारी रात्री एक गुप्त सूचना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मालाड येथील एका पॉलिक्लिनिकवर छापा मारला. या क्लिनिकची झडती घेण्यात आली. त्यावेळी फ्रीजरमध्ये एका बुजुर्ग व्यक्तीचा मृतदेह मिळाला. विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून दुरुस्तीसाठी हे क्लिनिक बंद होतं.

काही सवाल

या घटनेनंतर स्थानिकांमधून काही सवाल केले जात आहेत. रहिवासी भागात मृतदेह ठेवण्याची परवानगी कोणी दिली? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. रहिवासी क्षेत्रात सुरू असलेल्या डे केअर सेंटर-क्लिनिकमध्ये दीर्घकाळ मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजरची व्यवस्था कोणत्या परवानगीने देण्यात आली होती? शवगृह किंवा मृतदेह ठेवण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती का? परवानगी देण्यात आली असेल तर कोणत्या नियम आणि परिस्थितीच्या आधारावर देण्यात आली, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर