Mumbai: मुलीशी मैत्री म्हणजे शारीरिक संबंधांना मान्यता नव्हे! लग्नाचं वचन देऊन मैत्रिणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

| Updated on: Jul 01, 2022 | 6:56 AM

एखाद्या मुलीने मुलाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले याचा अर्थ ती मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देईल असा होत नाही. किंबहुना त्याने तसे गृहीतही धरू नये असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला.

Mumbai: मुलीशी मैत्री म्हणजे शारीरिक संबंधांना मान्यता नव्हे! लग्नाचं वचन देऊन मैत्रिणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
Follow us on

मुंबई: लग्नाचे (Marriage)आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी फेटाळून लावला. आशिष चकोर असे त्या आरोपीचे नाव आहे. एखाद्या मुलीने मुलाशी मैत्रीपूर्ण (Friendship) संबंध ठेवले याचा अर्थ ती मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देईल असा होत नाही. किंबहुना त्याने तसे गृहीतही धरू नये असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. आजच्या समाजात जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात तेव्हा त्यांच्यात जवळीक निर्माण होण्याची शक्यता असते. एकतर मानसिकदृष्ट्या (Emotionally) एकत्र जोडले जातात किंवा एकमेकांवर मित्र म्हणून विश्वास ठेवतात. मैत्री ही लिंगावर आधारित नसते. असे असले तरी चांगली मैत्री म्हणजे एखाद्या पुरुषाला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा परवाना देईल असा त्याचा अर्थ होत नाही, असे न्यायमूर्तीनी निकाला नमूद केले व आरोपी आशीषला दिलासा देण्यास नकार देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला

लग्नाचे वचन दिले आणि अत्याचार केले

तक्रारदार पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांमध्ये मैत्री असून 2019 साली आशिषने पीडितेला आपल्या मित्राच्या घरी नेले व तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला. तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिला लग्नाचे वचन दिले आणि अत्याचार केले. ती गरोदर राहिल्यानंतर आशीष तिला टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत आशीषविरोधात एफआयआर नोंदवला. अटक होऊ नये यासाठी आशीषने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता- न्यायालय

पीडितेच्या संमतीनेच शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा अटकपूर्व जामीन मागताना आरोपी आशिषने केला मात्र न्यायालयाने आरोपीचा दावा फेटाळलाय. मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे हे समजू नये, असे स्पष्ट केले. शिवाय शारीरिक संबंधांना तक्रारदार तरुणीने संमती देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता की नाही हे तपासण्यासाठी आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले व आरोपीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.

हे सुद्धा वाचा