AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rainy Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणार; लोकसभा सचिवालयाकडून घोषणा

देशात महागाईचा उसळलेला आगडोंब, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यात आलेले अपयश, इंधन दरवाढ आदी अनेक प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित होऊ शकतात. याचबरोबर सध्या तरुणांच्या संतापाचा उद्रेक करणारी अग्निपथ योजनाही मोदी सरकारसाठी अधिवेशन काळात डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.

Rainy Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणार; लोकसभा सचिवालयाकडून घोषणा
संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणारImage Credit source: Google
| Updated on: Jul 01, 2022 | 2:32 AM
Share

नवी दिल्ली : देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात, 18 जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन (Rainy Session) सुरू होणार आहे. हे अधिवेशन जवळपास महिनाभर म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. लोकसभा सचिवालया (Lok Sabha Secretariat)ने गुरुवारी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि त्याद्वारे अधिवेशनाची तारीख जाहीर (Date Announced) करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विविध निर्णयांवरून देशभरात असंतोष खदखदत आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेताहेत? सरकारला कशा प्रकारे जाब विचारणार? याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

अग्निपथ योजनेवरून सरकारविरूध्द हंगामा होण्याची शक्यता

देशात महागाईचा उसळलेला आगडोंब, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यात आलेले अपयश, इंधन दरवाढ आदी अनेक प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित होऊ शकतात. याचबरोबर सध्या तरुणांच्या संतापाचा उद्रेक करणारी अग्निपथ योजनाही मोदी सरकारसाठी अधिवेशन काळात डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. कंत्राटी सैन्यभरतीच्या अग्निपथ योजनेवरून विरोधकांकडून मोदी सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. यंदा विरोधकांनी अग्निपथ योजनेवरुन मोदी सरकारला चहुबाजूने घेरण्याची तयारी केली आहे. गेल्या वर्षीचे पावसाळी अधिवेशन प्रचंड गदारोळात पार पडले होते. विरोधी पक्षांनी पेगॅसस हेरगिरी घोटाळा, शेतकरी आंदोलन आणि इंधन दरवाढ यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. केंद्राने ती परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घातला होता.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार

18 जुलैपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 18 बैठका होणार आहेत. सध्याच्या संसद भवनातील हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि 21 जुलै रोजी मतमोजणी केली जाईल. नवीन राष्ट्रपती 25 जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील कार्यालयात पदाची शपथ घेतील. तसेच उपराष्ट्रपतींची निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होईल. नवीन उपराष्ट्रपती 11 ऑगस्टला कार्यभार स्वीकारतील, असे लोकसभा सचिवालयाच्या पत्रकात म्हटले आहे. (Announcing by the Lok Sabha Secretariat that the monsoon session of Parliament will begin on July 18)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.